|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » महिला बाल कल्याण खात्यात सुधारणा करणार

महिला बाल कल्याण खात्यात सुधारणा करणार 

प्रतिनिधी /पणजी :

 महिला व बाल कल्याण खात्याचा दर्जा सुधारण्यासाठी खात्याने अनेक निर्णय घेतले असून गर्भवती महिला व लहान मुलांच्या काळजीसाठी सल्लागार समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही सल्लागार समिती नजर ठेवणार असून महिलांचे व लहान मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अंगणवाडीमध्ये पाहणी करणार आहे. गेली अनेक वर्षे अंगणवाडीतील समस्या तशाच आहेत, त्या आता सुधारल्या जाणार असल्याचे महिला व बालकल्याणमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 अंगणवाडीमध्ये गर्भवती महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी पौष्टिक अन्न मिळावे यासाठी सरकार कोटय़वधी रुपये खर्च करत आहे. पण त्याचा त्यांना योग्य लाभ होतो तसेच त्यांना पौष्टिक, दर्जेदार अन्न मिळते का, याची पाहणी केली जाणार आहे. मुलांचे पहिले 1 हजार दिवस हे खूप काळजीचे असतात. त्यामुळे त्यांना पोषक आहार मिळणे गरजेचा असतो. तसेच गरोदर महिलांनाही पौष्टिक आहार गरजेचा असतो. म्हणून अंगंणवाडीतील सेविका, कर्मचाऱयांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेतली जाणार आहे, असेही यावेळी मंत्री राणे म्हणाले.

  सल्लागार समितीचे अध्यक्ष हे या खात्याचे मंत्री असणार आहेत, तर उपाध्यक्ष म्हणून शहिला डिसोझा यांची निवड करण्यात आली आहे. ललिता जोशी व ऍड. शुभलक्ष्मी नाईक व अन्य सदस्य या समितीचे सदस्य असणार आहेत. हे सर्व महिलांवर अभ्यास करणारे व त्यांच्या समस्या जाणून घेण्यात खूप अनुभवी असल्याने त्यांची  निवड करण्यात आली असल्याचे यावेळी मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

Related posts: