|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दिगंबर कामत यांचा आता सोमवारी फैसला

दिगंबर कामत यांचा आता सोमवारी फैसला 

प्रतिनिधी /पणजी :

खाण घोटाळ्यातील संशयित आरोपी दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होणार की नाही हे येत्या 11 डिसेंबर 2017 रोजी ठरणार आहे, तर डॉ. प्रफुल्ल हेदे खाण प्रकरणात दिगंबर कामत यांना अटक करायचे असल्यास न्यायालयात धाव घेण्यास पोलीस 48 तासाची मुदत देणार आहेत.

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयासमोर दोन अटकपूर्व जामीन अर्ज सादर केले होते. पैकी प्रफुल्ल हेदे खाण घोटाळाप्रकरणी नोंद झालेल्या गुह्यात अटक करायची असल्यास अटक करण्यापूर्वी 48 तासाची मुदत दिली जाणार आहे. मात्र 35 हजार कोटी रुपयांच्या प्रमुख खाण घोटाळ्यात अटकपूर्व जामीन देण्यास कडाडून विरुद्ध केल्याने सुनावणी 11 डिसेंबर 2017 रोजी ठेवण्यात आली आहे.

मुख्य प्रकरणात जामीन देण्यास कडाडून विरोध

खाण मालक डॉ. प्रफुल्ल हेदे यांना यापूर्वीच अटकपूर्व जामीन मजूर झाला आहे. प्रफुल्ल हेदे खाण प्रकरणात दिगंबर कामत यांच्या विरोधात एस. आय. आय. टीने सौम्य भूमिका घेतली तर मुख्य प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास कडाडून विरोध करुन ही अटक का हवी याचे स्पष्टीकरण देण्याची संधी सरकारी अभियोक्त्यांनी न्यायालयाकडे मागितली.

हेदे प्रकरणात 48 तासांची नोटीस देणार

डॉ. प्रफुल्ल हेदे प्रकरणात तपासकार्य प्राथमिक स्तरावर आहे. तूर्त त्यांची अटक आवश्यक नसली तरी गुह्याच्या पुढील तपासासाठी आवश्यकता भासेल. त्यामुळे कामत यांना अटक करण्यापूर्वी 48 तासांची नोटीस दिली जाईल. या काळात त्यांनी जर अटकपूर्व जामीन मिळवला तर ठिक नाहीतर त्यांना अटक केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने निकालात काढला आहे.

Related posts: