|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात दरवर्षी 200 कर्करोग रुग्णात वाढ

गोव्यात दरवर्षी 200 कर्करोग रुग्णात वाढ 

प्रतिनिधी /पणजी :

कर्नाटक कुंठा या भागातील रुग्णांना जवळपास इस्पितळ नसल्याने त्यांना गॉमेको किंवा मँगलोर या ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. त्यांचा महिन्याचा पगार 2,500 रु. एवढाच असतो त्यामुळे ते इस्पितळात उपचार घेऊ शकत नाही. इंडियन मॅडिकल असोसिएशन गोवा राज्याच्या सहकार्याने आपल्याला सदर ठिकाणी जाऊन रुग्णांची सेवा करण्याची संधी मिळाली असून सहकाऱयांसोबत एका दिवसात 5 मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या व ते रुग्ण आज चांगल्या स्थितीत आहेत. गोव्यात दरवर्षी 200 हून अधिक नवीन कर्करोगांच्या रुग्णात वाढ होते असे मत डॉ. शेखर साळकर यांनी व्यक्त केले.

इंडिया मेडिकल असोसिएशन गोवा यांच्या सहकार्याने मणिपाल इस्पितळामधील काही निवडक डॉक्टर आणि पारिचारिका यांना रेल्वे इस्पितळात कर्नाटक कुंठा येथे उपचार करण्याची संधी मिळाली व यावेळी आलेला अनुभव कथन करण्यासाठी व रुग्णांच्या प्रतिक्रीया सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. मेधा साळकर, डॉ. सुरेंद्र, डॉ. उमा आणि डॉ. विल्मा उपस्थित होत्या.

रेल्वे इस्पितळाचे वैशिष्टय़ म्हणजे यात इस्पितळमध्ये असणाऱया सर्व सुविधा आहेत तसेच गरजु लोकांना यांचा फ्ढायदा होतो. प्रथम 15 दिवस सदर ठिकाणी जाऊन याची जागृती करण्यात येते. जागृती करण्यात वॉट्सऍप या सोशन ऍपचा मोठय़ाप्रमाणात फ्ढायदा झाला आहे. सर्व अत्याधुनिक सुविधा असल्याने मोठय़ातल्या मोठय़ा शस्त्रक्रीया करण्यास शक्य झाले व ते सर्व रुग्ण आज सुस्थितीत आहे. त्यात भटकळ, अनावर आणि कुंठा या गावातील रुग्णांचा समावेश आहे. असेही डॉ. साळकर यांनी सांगितले.

Related posts: