|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भारतभरातील लेखकांना भेटण्याची चांगली संधी

भारतभरातील लेखकांना भेटण्याची चांगली संधी 

प्रतिनिधी /पणजी ?:

गोव्यात अनेक मोठमोठे उत्सव तसेच कार्यक्रम होत असतात त्यामुळे गोव्याचे नाव आज सर्वत्र घेतले जाते. पहिल्यांदा पर्यटन स्थळ म्हणूनच प्रसिद्ध असलेले गोवा राज्य आज साहित्य आणि संस्कृतीमुळेही तेवढेच प्रचलित झाले आहे. गोव्यात प्रत्येक भाषेची संमेलने आणि महोत्सव होतात त्यामुळे गोव्यातील लेखक एकमेकांना भेटतात पण भारतातील लेखक इतर भाषेतील व राज्यातील लेखकांना भेटण्याची संधी ही गोवा कला आणि साहित्य महोत्सवामुळे मिळते असे उद्गार कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी काढले.

कला व संस्कृती संचालनालय गोवा व नॉर्थ इस्टर्न काऊनसिल मिनिस्ट्री ऑफ्ढ डोनर यांच्या सहयोगाने इंटरनॅशनल सेंटर गोवा आणि गोवा रायटर आयोजित  8 व्या गोवा कला आणि साहित्य महोत्सव 2017 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा महोत्सव 10 डिसेंबरपर्यत सुरू असणार आहे. यावेळी  इंटरनॅशनल सेंटर गोवा अध्यक्ष यतीन काकोडकर, इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा, ऍड. मिनी कृष्णन व चित्रकार हनुमन कांबळी यांची उपस्थिती होती. जुझे लॉरेन्स यांनी सूत्रसंचालन केले.

रामचंद्र गुहा यावेळी म्हणाले की, हा महोत्सव आपल्याला आवडत्या महोत्सवांपैकी एक असून याला माझ्या जीवनात दुसरे स्थान आहे. इतिहास लिहीण्यासाठी अनेक पुस्तकांचा आणि वर्तमानपत्रांचादेखील आधार घ्यावा लागतो. इतिहास ही साहित्यातली एक अत्यंत महत्वाची शाखा आहे अयेही यावेळी ते म्हणाले.

Related posts: