|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्वरी रायझिंग टीमतर्फे 10 रोजी ‘नोमोझो’ कार्यक्रम

पर्वरी रायझिंग टीमतर्फे 10 रोजी ‘नोमोझो’ कार्यक्रम 

प्रतिनिधी /पणजी :

 ‘पर्वरी रायझिंग टीम’तर्फे रविवारी 10 डिसेंबर रोजी पर्वरीतील सर्व्हीस रोडवर ‘नोमोझो’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे. पर्वरीतील या सर्व्हीस रोडवर या दिवशी नो मोटार झोन असून या दिवशी या रस्त्यावर वाहनांना बंदी असणार आहे, असे यावेळी या संघटनेचे अध्यक्ष सुरज बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘नामोझो’ हा महोत्सव म्हणजे या दिवशी सर्व्हीस रोडवर पूर्णपणे गाडय़ांना बंदीं असणार असून याठिकाणी या रस्त्यावर खास मुलांसाठी ज्येष्टांसाठी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. सायकलिंग तसेच अन्य विविध स्पर्धा होणार आहे. रस्त्यावर वेगवेगळे स्टॉल्स मांडण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्टॉल्स हे स्वयंसहाय्य महिला गटांचे असणार आहे. या वेळी या रस्त्यावर मौज मजा तसेच वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम असणार आहे. लोकांना एक दिवसतरी या रस्त्यावर मुक्तपणे  sआनंद लुटता यावा यासाठी या कार्मक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे sयावेळी व्यंकटेश वस्त यांनी सांगितले. पर्वरीचा आमदार रोहन खवटे यांनी महामार्गाच्या लागूनच सर्व्हीस रोड तयार केला आहे. सर्व्हीस रोड झाला तरी या ठिकाणी आता मोठय़ा प्रमाणात वाहने जात असतात. एकदिवस तरी लोकांना या रस्त्यावर मुक्तपणे फिरण्यासाठी मिळावा यासाठी हा कार्यक्रम आहे. एरव्ही पर्वरी महामार्गावर गाडय़ांची  वर्दळ खूप असते. रोहन खवटे यांच्यामुळे आज पर्वरीला हा रस्ता मिळाला आहे. त्याचा फायदा लोकांना होते आहे. यावेळी या रस्त्यावर विविध  कार्यक्रम होणार आहे. प्रसिद्ध संगीतकार निखिल चिनाप्पा हे या कार्यक्रमामध्ये असणार आहे. तसेच मुलांसाठी विविध कार्यक्रम सायकल स्पर्धा होणार आहे. यात मोफत प्रवेश असून सगळय़ांनी या कार्यक्रामचा लाभ घ्यावा असे यावेळी सुरज बोरकर यांनी सांगितले.

Related posts: