|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सेरेन्डिपीटी कला महोत्सव 15 पासून

सेरेन्डिपीटी कला महोत्सव 15 पासून 

प्रतिनिधी /पणजी :

सेरेन्डिपीटी कला महोत्सव 2017 चे आयोजन पणजी शहरात करण्यात आले असून तो 15 ते 22 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यंदा महोत्सवाची दुसरी आवृत्ती असून त्यात नामवंत कलाकारांचा समावेश आहे.

महोत्सवाच्या संचालिका स्मृती राजगारिया यांनी जुन्या सचिवालयात अर्थात अदिलशाह पॅलेसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देऊन सांगितले की गेल्या वर्षी झालेल्या पहिल्याच उद्घाटनपर शुभारंभी महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने यंदाही दुसऱया वर्षी हा महोत्सव उत्साहाने आयोजित करण्यात आला आहे. गेल्यावर्षीच्या महोत्सवानंतर यंदा दर्शकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. कला महोत्सव करण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांकरीता गोवा हे मुख्य महत्वाचे ठिकाण म्हणून नावारुपास आले आहे.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार यंदाच्या सेरेन्डिपीटी महोत्सवात सहभागी होणार असून त्यात ललित दुबे, रणजित बरात, शुभा मुदगल, प्रशांत पंजियर यांचा समावेश आहे. पणजी शहरातील विविध अशा एकूण 9 ठिकाणी हा महोत्सव होणार असून तो सर्व रसिकांसाठी पूणेपणे मोफत आहे व कोणतीही प्रवेश फी नाही. कॅप्टन ऑफ पोर्ट जेटी, कला अकादमी, दयानंद बांदोडकर मैदान, मांडवी किनारा, सांता मोनिका जेटी, अदिलशहा पॅलेस, गोवा मनोरंजन सोसायटी अशा विविध ठिकाणी हा कार्यक्रम आखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मांडवी नदीकिनारी 15 डिसेंबर रोजी या सेरेन्डिपीटी कला महोत्सवाचे उद्घाटन होणार असून तो सुमारे 8 दिवस चालणार आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, अध्यात्मिक, शिस्त, प्रगती, विकास अशा विविध विषयांचा समावेश त्या महोत्सवात असून त्या त्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित रहाणार असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: