|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कांदोळीतील गांजा शेतीची सखोल चौकशी व्हावी

कांदोळीतील गांजा शेतीची सखोल चौकशी व्हावी 

प्रतिनिधी /पणजी :

गोव्यात गांजाची लागवड करणे हा गंभीर विषय असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. गांजा लागवडीशी संबंधित असलेले कांदोळीचे सरपंच ब्लेझ फर्नांडिस व लेनी फियालो यांच्याकडूनही याबाबत स्पष्टीकरण मिळायला हवे, असेही ते म्हणाले.

शेजारच्या राज्यातील विर्डी गावात याअगोदर गांजाची लागवड होत असल्याचे काँग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले होते. त्याचबरोबर गोव्यातही अशा प्रकाराबाबत दक्षता बाळगण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. आज तोच प्रकार गोव्यात उघडकीस आला आहे. अमलीपदार्थाची विक्री गोव्यात व्हायला लागली. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी व्हायला हवी.

मागील दोन वर्षे गांजाची शेती केली जाते. पोलिसांनी आता अशा प्रकाराबाबत दक्षता बाळगायला हवी. गांजा शेतीचा नवीन प्रकार गोव्यात सुरू झाला आहे. बाजूला मोठी वेगळी झाडे लावायची व त्याच्या खाली ही शेती केली जात आहे. दोन वर्षे ही शेती लपवून ठेवली गेली. असे आणखी प्रकार असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर अशा पद्धतीने गांजाची शेती करता येते हेही आता इतरांना समजले आहे. त्यामुळे पोलिसांनीही सतर्क राहण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Related posts: