|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शोकाकूल वातावरणात खाण दुर्घटनेतील मनोज नाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शोकाकूल वातावरणात खाण दुर्घटनेतील मनोज नाईकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार 

प्रतिनिधी /फोंडा :

शोध मेहिमेच्या अथक परीश्रानंतर कोडली येथील सेसा वेदांत या कंपनीत खाण दुर्घटनेत गाढला गेलेल्या खाण ऑपरेटर मनोज नाईक यांच्या मृतदेहावर शोकाकुल  वातावरणात काल गुरूवारी दुपारी 3 वा. सुमारास नाल्लाकोंड येथील स्थानिक स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळाल्यानंतरच मृतदेह नातेवाईकांनी हॉस्पिसिओ येथून स्वीकारला. यावेळी स्थानिक आमदार रवी नाईक, पंचसदस्य संदीप खांडेपारकर व सेसा वेदांताचे कर्मचारी व मयत मनोजचे सहकारी अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

  दुर्घटनेला जबाबदार कंपनी अधिकाऱयांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत तसेच मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा त्याच्या नातेवाईकांनी दिला होता. कंपनी अधिकाऱयाशी बोलणीनंतर  आश्वसनाच्या हमीनंतर त्याच्या कुठूंबियांनी मयत मनोज यांचा मृतदेह स्वीकारला. दुर्घटनेतील मयत मनोजच्या कुठूबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी सहकार्य केल्यानेच हे संभव झाले अशी प्रतिक्रिया त्यांच्या कुठूबियांकडून व्यक्त करण्यात आलीं.

  सदर घटना कोडली येथील सेसा वेदांत या कंपनीत शनिवार 2 डिसें. रोजी  सायंकाळी घडली होती. सायं. 5.30 वा. सुमारास रिजेक्टेड मालाचा ढिगारा खचल्याने ही दुर्घटना घडली होती. माल उपसण्याच्या कामात गुंतलेले रिपर मशिन उत्खनन पिठात कोसळले होते, तर त्यावरील ऑपरेटर मनोज नाईक हा ढिगाऱयाखाली गाढला गेला होता. तपालासाला योग्य दिशा देताना राष्ट्रीय आपत्ती बचाव दलातील पुणे येथील पथक बोलावून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मनोजच्या मोबाईल संचच्या लोकेशनाचा त्यासाठी महत्त्वाचा उपयोग झाला. त्यामुळेच प्रथम त्याचा मोबाईल संच हाती लागला व काही तासांनी त्याचा मृतदेह सापडला होता. उत्खनन पिठात कोसळलेले रिपर मशीन मात्र अद्याप सापडलेले नाही. शोध मोहिमेच्या चौथ्या दिवशी मंगळवार 5 डिसें. रोजी  सायं. 6.20 वा. सुमारास सेसा वेदांत खाणीवर मातीच्या ढिगाऱयाखाली गाढल्या गेलेल्या मनोज अनंत नाईक (42, रा. खांडेपार) या मशिन ऑपरेटरचा मृतदेह सापडला होता. दरम्यान या दुर्घटनेला जबाबदार कंपनी अधिकाऱयांवर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत तसेच मृत ऑपरेटर मनोज याची पत्नी व मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेण्याची लेखी हमी कंपनीकडून मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे वेदांत कंपनीसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर मयत मनोजच्या कुठूंबियांना वाढता पाठिंबा असल्याने जाणून हे प्रकरण चिघळण्याअगोदर कंपनीने योग्य शिष्टाई दाखवित नाईक कुठूबियांच्या भवितव्याच्या जबाबदारीचा निर्णय घेतला.  

 

Related posts: