|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शासनाच्या प्रभावी योजनांमुळे दोन्ही काँग्रेस हतबल – देशमुख

शासनाच्या प्रभावी योजनांमुळे दोन्ही काँग्रेस हतबल – देशमुख 

प्रतिनिधी /इस्लामपूर :

जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. एक खासदार, चार आमदार, पाच पंचायत समित्या, दोन नगरपालिका व जिल्हा परिषेद भाजपाच्या ताब्यात आहे. देशात व राज्यात भाजपा सरकार नवनविन योजना राबवित आहे. शासनाच्या माध्यामातून प्रभावी योजना राबवल्याने राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष हातबल झाले असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा भाजपाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले. 

येथील रमाडा हॉटेल येथे वाळवा तालुका भाजपा कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान ते बोलत होते. यावेळी आ.शिवाजीराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे, नगराध्यक्ष व भाजपा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी आमदार देशमुख पुढे म्हणाले, पक्ष मजबुतीसाठी बुथ रचना करणे गरजेचे आहे. संपूर्ण देशभरात पक्षाच्यावतीने बुथ रचनेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामाध्यमातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पूर्वी अत्यंत कठीण परिस्थितीत भाजपा पक्ष †िटकवण्याचे काम विक्रम पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी येथून पुढे देखील हा इंद्रधनुष्य पुढे घेवून जावे. तसेच शेतकऱयांची कर्जमाफी व पाणी योजना या विकासासाठी कोटय़ावधींचा निधी मिळत असल्याने जिह्यात नविन विकासाचे पर्व निर्माण झाले आहे. जिह्या प्रमाणे वाळवा तालुक्यात देखील नविन लोकांना पक्षात सामावून घेवून पक्ष मजबुत करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आ.नाईक म्हणाले, भाजपा हा शिस्तबध्द पक्ष आहे. स्वर्गिय गोपिनाथ मुंडे यांनी वाकुर्डे बुद्रुक योजनेचे भूमीपूजन केले. आम्ही ही योजना पूर्ण करण्याचे ठरवले आहे. शेतकऱयांच्या जमिनीचे नुकसान होवू नये, यासाठी पाईपव्दारे पाणी पुरवठा करुन योजना पूर्ण करु. रेठरेधरण पर्यंत पाणी प्रश्न लवकरच सुटेल. कार्यकर्त्यांनी शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे. बुथ योजनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा चांगला संच तयार होईल, असे ही त्यांनी सांगितले.

Related posts: