|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजस्थानात लव्ह जिहाद प्रकरणातून हत्या

राजस्थानात लव्ह जिहाद प्रकरणातून हत्या 

 उदयपूर / वृत्तसंस्था

राजस्थानातील राजसमंद येथे लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुस्लीम युवकाची कुऱहाडीचे घाव घालून हत्या करण्यात आली आहे. घाव घातल्यानंतर त्याला पेटवून देण्यात आले. या घटनेचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले असून ते प्रसिद्धही करण्यात आले आहे. सर्व लव्ह जिहादींना याच मार्गाने जावे लागेल, असा संदेश या व्हिडीओत हत्या करणाऱयाने दिला आहे.

बुधवारी अर्धवट जळलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. तो पर्यंत व्हिडीओ चित्रणही समाजमाध्यमांवर उपलब्ध झाले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मुस्लीम युवकाचे नाव अफरझुल असे आहे. तो मजूरीचे काम करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचे नाव शंभू लाल आहे.

प्रारंभी हत्येचे कारण, तसेच ही हत्या कोणी केली याची माहिती उपलब्ध झाली नव्हती. मात्र व्हिडीओ उपलब्ध झाल्याने हत्येचे कारण आणि आरोपीचा शोध घेतला गेला. ज्याची हत्या झाली तो पश्चिम बंगालमधील माल्दा जिल्हय़ातील रहिवासी होता. तो कामानिमित्त राजस्थानात आला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे समोर आले आहे.

Related posts: