|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार ः राहुल गांधी

गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार ः राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / उदयपूर :

गुजरातमध्ये काँग्रेसच जिंकणार असल्याचा विश्वास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज व्यक्त केला. गुजरातमध्ये काँग्रेसचे वादळ असून ते कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

भाजपने आपला जाहीरनामा अजूनही जाहीर केला नाही, त्यामुळे राज्याचा विकास ते काय करणार ? गुजरातमध्ये सर्वत्र काँग्रेसचेच वारे आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर दहा दिवसात शेतकऱयांच्या कर्जमाफीचे धोरण सादर करेल. पंतप्रधानांच्या खुर्चीचा काँग्रेस आदर करते. त्यामुळेच आम्ही मोदींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱया मणिशंकर अय्यर यांच्यावर कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.