|Monday, June 17, 2019
You are here: Home » उद्योग » अर्थव्यवस्थेचा विकास 7.5 टक्के

अर्थव्यवस्थेचा विकास 7.5 टक्के 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा भरारी घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. 2018 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 7.5 टक्क्यांवर पोहोचेल. गेल्या वर्षी हा दर 6.4 टक्के होता. 2019 मध्ये हा दर वाढत 7.7 टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे, असे मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालात म्हणण्यात आले.

उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात वाढ आणि ताळेबंद सुधारण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीत वाढ होत असल्याने आर्थिक प्रणाली सुधारण्यास मदत होईल. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मागणीत वाढ होत आहे आणि खासगी गुंतवणूक पुन्हा वाढत आहे. वस्तुंचा वापर आणि निर्यातीमध्ये वाढ होत आहे, त्याचा फायदा या क्षेत्राला मिळेल. बँकिंग क्षेत्रात सरकारकडून भांडवल उभारण्यास मदत येणार असल्याने बँकिंग क्षेत्रातील धोक्याचे प्रमाण कमी होईल आणि देशांतर्गत गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत होईल. फळ, धान्याच्या किमती वाढल्याने महागाई काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे, असे अहवालात म्हणण्यात आले.