|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » बहुतांशी इमारतींना फायर ऑडीटच नाही

बहुतांशी इमारतींना फायर ऑडीटच नाही 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरात सध्या सुमारे 38 हजार मिळकतधारक आहेत. यामध्ये पाचशे इमारतींनाही अग्निशामक प्रतिबंधक योजना नाही. त्यामुळे शहरात आग लागण्याच्या घटना वांरवार घडत आहीत. पालिका प्रशासनाकडून फायर ऑडिटबाबत वेड पांघरुन पेडगावला जाण्याचा प्रकार याबाबतीत सुरु आहे. अजिंक्य कॉलनीतील मेडिकलला आग लागल्यानंतर मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी बैठकीचा फार्स केला. परंतु सध्या केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या इमारतींनाच अग्निशामक प्रतिबंध यंत्रणा आहे. त्यामुळे यामध्ये पालिकेचेही हात बरबटले आहेत हे नक्की.

सातारा शहराचा विस्तार झपाटय़ाने होत आहे. पालिकेच्या हद्दीत सध्या सुमारे 38 हजार मिळकतधारक आहेत. त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढयाच इमारतींचे फायर ऑडिट झाले आहे. काही इमारतींना तर अग्निशामक हे काय असते हे सुद्धा माहिती नाही?, त्यामुळे या वर्षात आगीच्या घटनां वाढल्या आहेत. शहरात नुकतीच आगीची घटना सदरबझार येथील अजिंक्य कॉलनीतील मेडिकलच्या गोदामाला लागली होती. त्यावरुन पालिकेत दुसऱया दिवशी लगेच पालिकेत बैठक पार पडली. परंतु यापूर्वीच पालिका प्रशासनाने जर बांधकाम परवाने देतानाच बांधकाम करणाऱयांना फायर ऑडिटबाबत प्रश्न केला असता, तशी अट टाकली असती तर निश्चित सातारा शहरात बहुतांशी सर्वाच्या मिळकतधारकांच्या मिळकतीचे फायर ऑडिट झाले असते. नगरविकास विभागाकडे  सध्या शहरात किती मिळकतींकडून ऑडिट झाले यांची नेंदच नाही. त्यामुळे शहरात आगीच्या घटना घडल्यानंतर पालिका प्रशासनाने बैठका घेवून वरातीमागून घोडे दामटण्याचा प्रकार केला आहे. मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी त्या बैठकीत अधिकाऱयांना सुचना केल्या असल्या तरीही शहरातील मोजक्याच इमारतींकडें तेही स्वतः मालकांनीच फायर ऑडिट केले आहे. मात्र, पालिकेच्या नगरविकास विभागाकडून तशा काही अटीही घातल्या गेल्या नाहीत. त्यांच्याकडून मात्र, एकच 15 मजली इमारत असले तरच आम्ही फायर ऑडिटची अट घालतो असे पालिकेच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पालिका प्रशासनाचा प्रकार म्हणजे वेड पांघरुण पेडगावला जाण्याचाच आहे.