|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » leadingnews » मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख 

ऑनलाईन टीम / नागपूर :

फेबुवारीत बडोद्यामध्ये होणाऱया 91व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कादंबरीकार,कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा 70 मतांनी पराभाव केला.

देशमुख यांना 427 मते मिळाली तर शोभणे यांना केवळ 357 मते मिळाली.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल देशमुख यांच्यावर साहित्यक्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याबाब बोलताना लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “बेडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे.या शहरात होणाऱया समेलनाचे अध्यक्षपद मला लाभले मी माझे सौभग्य समजतो.सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार.मी कार्यकर्ता होता यापुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करेल’’

 

Related posts: