|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे

खारघरमधील रिक्षाचालकांचा संप अखेर मागे 

ऑनलाईन टीम / नवी मुंबई :

खारघरमधील रिक्षाचालकांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.खारघर एकाता रिक्षा युनियनने संप मागे घेत असलयाची घोषणा केली.आंदोलन मागे खारघरवासियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

21 नोव्हेंबर रोजी हद्दीच्या वादातून खारघर रेल्वे स्थानाकावर रिक्षाचालकांच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.या घटनेत एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता, या प्रकरणी सात रिक्षाचालकांना अटक करण्यात आली होती.यानंतर खारघरमधल्या 800 रिक्षाचालकांनी बंद पुकारला होता.

तळोजा रिक्षाचालकांनी दगडफेक करून मारहाण केली असतानही खारघर रिक्षाचालकांना अटक केली, असा आरोप खारघरमधील रिक्षाचालकांनी केला होता. रिक्षाचलकांच्या संपामुळे खारघरमधील रहिवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला,पण 28 नोव्हेंबर रोजी संप मागे घेत असल्याची घोषणा रिक्षा युनियनने केली होती.पण दुसऱया दिवशी संघटनांनी मुजोरी कायम ठेवत ,संप सुरूच ठेवला होता. त्यानंतर पनवेल आरटीओने ज्या रिक्षा संपात सहभागी झाल्यात अशा सर्वांना परवाने रद्द करण्याच्या नोटिसाही बजावल्या होत्या.आरटीओच्या कठोर भूमिकेनंतर रिक्षाचालक संघटनांनी सावध पवित्रा घेत, आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.आज दुपारी 3 वाजल्यापासून रिक्षा पुन्हा सुरू होतील,अशी माहिती खारघर एकता रिक्षा युनियनच्या वतीने देण्यात आली.

 

Related posts: