|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » नमनचे सलग तीन प्रयोग होणार

नमनचे सलग तीन प्रयोग होणार 

कोकणातील ज्या अनेक पारंपरिक कला आहेत त्यात नमन ही एक कला आहे. शफंगारी गवळण आणि त्यानंतर लोकनाटय़ पद्धतीने सादर केले जाणारे नमन असे त्याचे स्वरुप असते. गावपातळीवर सादर होणारी ही कला गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतही मानाचे स्थान मिळवत आहे. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्यामुळे साहित्य संघ, दामोदर हॉल इथल्या हक्काच्या नाटय़गफहात या नमनचे प्रयोग होताना दिसतात.

 गेल्या अनेक वर्षांचा नमनचा प्रवास लक्षात घेतला तर वेशभूषा, रंगभूषा, संगीत, गाणी यात प्रत्येक संस्थेने आमूलाग्र बदल केलेला आहे. परंतु, जागतिक पातळीवर विक्रमी नोंद म्हणून प्रयोग करण्याचे धाडस अद्याप कोणीही केले नव्हते. अशोक दुदम हे रत्नागिरी जिह्यातील गोळवली गावचे सुपुत्र आहेत. गेली बावीस वर्षे ते नमन क्षेत्रात कवी, नफत्य, संकल्पना, दिग्दर्शक, गीत रचना, गायक, वादक अशी अनेक कामे करीत आले आहेत. महाराष्ट्रात त्यांचा स्वत:चा असा प्रेक्षकवर्ग आहे. गेल्यावर्षी मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये तीन हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत नाद पंढरीचा हे नमन सादर केले होते. नमनच्या क्षेत्रात हा विक्रमी प्रयोग असल्याची नोंद झाली आहे. विशेष आणि दखल घेणाऱया प्रयोगासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात म्हटल्यानंतर यावर्षीसुद्धा आणखी एक विक्रम प्रस्थापित करण्याचे ठरविले आहे. अदृश्य रंगकर्मी हे लोकनाटय़ स्वरुपाचे नमन एकाच दिवशी सलग तीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे.

  गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात रविवारी 17 डिसेंबर सकाळ, दुपार, रात्री असे तीन प्रयोग होणार आहेत. शफंगारी गवळणची गीतरचना अशोक दुदम यांनी केली आहे. अदृश्य रंगकर्मीचे लेखन रुपेश दुदम याने केले असून रोहित विचारे याच्याबरोबर रुपेशनेही या नमनचे दिग्दर्शन केले आहे. नफत्यदिग्दर्शनाची जबाबदारी विलास विंजले याने सांभाळली आहे. ‘कळत नकळत’ या नाटकात मुख्य भूमिकेत दिसलेला आणि अनेक पुरस्कार प्राप्त सूर्या गोवळे हा यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो आहे. रोहित विचारे, अभिलेश सरपडवळ, सुबोध जाधव, सुधीर भुवड, प्रकाश करंडे, विशाल विंजले आदी वीसहून अधिक कलाकारांचा यात सहभाग आहे. सुनील वीर, विनोद गुरव, योगेश गोताड, राजेंद्र कदम, विलास पालवकर यांचा स्वर या नमनला लाभणार आहे. षण्मुखानंदच्या विक्रमी प्रयोगात ज्या कलाकारांचा सहभाग होता तेच कलाकार हा दुसरा विक्रमही प्रस्थापित करणार आहेत. मनोरंजनातून प्रबोधन हा या रंगकर्मींचा ध्यास आहे. गेल्यावर्षीच्या प्रयोगातून खर्च वजा करून जो निधी उभा राहिला तो गोळवली गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सत्कारणी लावला. रत्नागिरीतील वफद्धाश्रमांना अर्थसहाय्य पुरविले. युवकांना रोजगार मिळवून देऊन त्यांना विवाह करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.

सलग तीन प्रयोगांचा हा जो विक्रम केला जाणार आहे त्याचा आनंद अडीच ते तीन हजार प्रेक्षक घेतील. मुंबईबरोबर महाराष्ट्रातील दोन हजार प्रेक्षकवर्ग खाजगी बसेस करून मुंबईत दाखल होणार आहेत. त्यातून मिळणारा निधी हा अशाच सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचे संस्थेचे सर्वासर्वे अशोक दुदम यांनी ठरविले आहे. नमनमध्ये रंगमंचव्यापक असे भव्य क्रीन कोणी लावत नाही पण अदृश्य रंगकर्मी या नमनसाठी तो लावला जाणार आहे.