|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » भाजपची विकासयात्रा फ्लॉप : राहुल गांधी

भाजपची विकासयात्रा फ्लॉप : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / बनासकांठा  :

ज्या प्रमाणे एखादा सिनेमा फ्लॅप होतो त्याचप्रमाणे भाजपची विकासयात्रा फ्लॉप झाली.गुजरात विधानसभेसाठी निवडणूक होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तान,अफगाणिस्तानचे मुद्दे मांडत आहेत.गुजरातबाबतही थोडी तुमची भूमिका मांडा असा उपरोधिक टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

बनासकांठा या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत पातळी सोडून टीका केली.त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसचे नेते मला शिव्या देण्याशिवाय काय करतात? असा प्रश्न काँग्रेसला विचारला होता,तसेच मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती असाही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता,हा आरोप काँग्रेसने फेटाळला.तसेच आज राहुल गांधी यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत गुजरातबाबत असा सल्ला दिला आहे.