|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत अ-बांगलादेश-अ महिला संघात आज पहिला टी-20 सामना

भारत अ-बांगलादेश-अ महिला संघात आज पहिला टी-20 सामना 

प्रतिनिधी / बेळगाव

बीसीसीआयच्या प्रोत्साहनामुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने यंदाच्यावषी इंग्लंड येथे झालेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावून भारतातील महिलांमध्ये एक चैतन्यमय वातावरण निर्माण केले आहे. याचबरोबर भारतीय अ संघाने नुकत्याच एक दिवशीय मालिकेत पाहुण्या बांगलादेश अ संघावर 3-0 असा विजय मिळवून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. उद्यापासून टी-20 सामने या दोन्ही देशाच्या दरम्यान बेळगावमध्ये खेळविले जाणार आहेत. आम्ही पुऱया आत्मविश्वासाने खेळणार आहोत, असे उद्गार भारतीय महिला अ संघाच्या कर्णधार अनुजा पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

सोमवारी बेळगावमधील आटोनगरच्या केएससीए स्टेडीयमवर झालेल्या पत्रकार परिषदेत बांगलादेशाची कर्णधार जहनरा अलाम या म्हणाल्या, सध्या एक दिवशीय मालिकेत आपण हरलो असलो तरी टी-20 मध्ये संघ तोच ठेवला आहे. यामुळे आमच्या संघात 8 अष्टपैलु क्रिकेटपटू 3 मध्यमगतीचे गोलंदाज, 3 डावखुरे फिरकी गोलंदाज, 2 ऑफस्पिनर असे आम्ही संघात ठेवले आहेत. त्यामुळे आम्हाला भारताविरुध्द चांगली कामगीरी करण्याची संधी मिळाली आहे. येथील खेळपट्टी फलंदाजाला अनुकुल आहे. येथील जेवण, हवामान, मैदान, बसची सुविधा, सरावासाठी खेळपट्टी तसेच  येथील आयोजक आमच्या संघाची चांगलीच काळजी घेत असून बेळगावबद्दल आम्हाला आदर वाटत आहे.

 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुजा पाटील म्हणाल्या, आमच्या संघात 11 नवीन चेहरे असून 3 मध्यमगतीचे गोलंदाज, 4 ऑफस्पिनर व 2 डावखुरी फिरकी गोलंदाजसह 8 अष्टपैलु क्रिकेटपटू आहेत. त्यामुळे आमचा संघ समतोल आहे. भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यामुळे आमच्या ज्युनिअर क्रिकेटपटूंना मोठा अभिमान वाटत आहे. भारतीय संघाने उपविजेतेपद पटकाविले असले तरी आम्ही बीसीसीआयच्या प्रोत्सानामुळे नक्कीच येत्या वर्ल्डकपमध्ये नेत्रदीपक कामगीरी करु, असा विश्वास व्यक्त केला. पुरुषांप्रमाणे महिलांसाठी बीसीसीआयने आयपीएल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली तर चांगले स्पर्धात्मक क्रिकेटपटू निर्माण होतील. याचा फायदा भारताच्या वरि÷ संघाला प्राप्त होईल, असे अनुजा पाटील म्हणाल्या.

भारतीय संघाचे प्रशिक्षक तुषार अरोटे म्हणाले बीसीसीआयने महिलांच्या भविष्यासाठी अनेक क्रिकेटमधील योजना आखल्या आहेत. याचे साधे उदाहरण म्हणजे 16, 19, 23 वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धा त्यांना दर्जेदार क्रिकेटपटूंच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जात आहेत. नुकत्याच बेंगळूरमध्ये भारताचे माजी कसोटी यष्टीरक्षकपटू किरण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील सहा निवडक महिला यष्टीरक्षकांना खास प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशा अनेक योजना बीसीसीआय करत आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत महिलांसाठी आयपीएल स्पर्धा देशात सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त केली.

गेली दोन दिवस भारतीय अ व बांगलादेश अ संघाने बेळगावच्या केएससीए स्टेडीयमवर कसून सराव केला. सकाळच्या सत्रात 4 तास व दुपारच्या सत्रात 3 तास असा सरावाचा कार्यक्रम आखला होता. त्यामुळे दोन्ही संघांनी बेळगावची खेळपट्टी फलंदाजाला अनुकुल आहे, अशी आशा व्यक्त केली. मंगळवारी सकाळी 10 वाजता सामन्याला सुरुवात होणार असून दुपारी सामनावीर पुरस्काराने सामन्याची समाप्ती होईल.

भारतीय महिलांचा संघः अनुजा पाटील (कर्णधार), एस. मेघना, जेमीमा रॉड्रीक्स, स्वागतीका राठ, पुजा वास्त्रकर, टी. पी. कनवार, सोनी यादव, रम्या डोली, व्ही. आर. वनिता, डी. हेमलता, देविका वैद्य, तनया भाटिया (यष्टिरक्षक),प्रशिक्षक बिजु जॉर्ज, फिजिओ ट्रसी फर्नांडिस, ट्रेनर अफजल.

बांगलादेश महिलांचा अ-संघः जनहरा अलाम (कर्णधार), रुमाल अहमद, निगर सुलतान जोटी, फरगना एच पिंकी, खडीजा-तुल कुब्रा, फहीमा खातुन, लिली राणी बिस्वास, नहीदा अक्तर, पन्ना घोष, सुराया आजमीम, सरमीन सुलताना, सलमा खातुन, लता मंडोळ, शैला शर्मीन, मुर्शिदा खातुन, शमीमा सुलताना, प्रमुख प्रशिक्षक डेव्हीड जॉन कॅपेल, संघ व्यवस्थापक आशीकर रहमान, फिजिओ फरजाना अमीन लिजा, ट्रेनर फातीमा तुज जहरा.