|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » स्नेहल भोंगाळेस वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

स्नेहल भोंगाळेस वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण 

प्रतिनिधी/इचलकरंजी

येथील व्यंकटराव हायस्कूलची विद्यार्थीनी स्नेहल सुकुमार भोंगाळे हीने गुवाहटी (आसाम) येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंगमध्ये 90 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. यावेळी तिने 70 किलो स्नॅच व 90 किलो क्लिन अँड जर्क असे एकूण 160 किलो वजन उचलून देशात प्रथम क्रमांक मिळवला. तर याच विद्यालयाची विद्यार्थीनी प्रतिक्षा बाळू साठे हिने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक प्राप्त केले.

यशस्वी विद्यार्थीनींना क्रीडाशिक्षक व्ही. एम. माळी, जी. एम. बरगाले व सौ. ए. एम. कांबळे यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका सौ. एम. बी. माने, उपमुख्याध्यापक एस. एस. खोचरे, पर्यवेक्षक ए. ए. खोत यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱयांचे मार्गदर्शन लाभले.