|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » Top News » संसदेवरील हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण

संसदेवरील हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज (बुधवार) 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त संसदेत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी एकमेकांना अभिवादन केले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल यांच्यासोबत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री राजनाथ सिंग, सोनिया गांधी, भाजपचे ज्ये÷ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.

13 डिसेंबर 2001 रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता. हल्ल्यात दिल्ली पोलिसांतील 5 जवान, सीआरपीएफची एक महिला अधिकारी, संसदेतील दोन सुरक्षा रक्षक आणि एक माळी शहीद झाले होते. लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनरी संसदेत विस्फोट करून खासदारांना बंधक बनवण्याचा कट रचला होता. देशाच्या जवानांनी आपल्या प्राणांची बाजी लावून दहशतवाद्यांचा कट उधळला होता. संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी हा हल्ला झाला. तेव्हा 100 खासदार संसदेत उपस्थित होते.

Related posts: