|Saturday, April 20, 2019
You are here: Home » leadingnews » गुजरातचा मतसंग्राम : रांगेत उभे राहुन मोदींनी केले मतदान

गुजरातचा मतसंग्राम : रांगेत उभे राहुन मोदींनी केले मतदान 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

काँग्रेस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील अखेरच्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे.93 जागांसाठी आज मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वसाधारण मतदाराप्रमाणे रांगेत उभे राहुन मतदान केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला समजल्या जाणऱया गुजरातमधील विधानसभा निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. पाटीदार समजाचे नेते हार्दिक पटेल,ओबीसी नेता अल्पेश ठाकूर व दलित नेता जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी भाजपसमोर आव्हान निर्माण केले राहुल गांधी यांच्या प्रचारसभांनाही अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. हार्दिक पटेल,अल्पेश ठाकूर आणि जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजपच्या अडचणी वाढल्या.राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड लागल्यावर ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसनेही कंबर कसलेली पहायला मिळाली.

Related posts: