|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Automobiles » ‘वोल्वो’ची लग्झरी कार भारतात लाँच

‘वोल्वो’ची लग्झरी कार भारतात लाँच 

ऑन्लाईन टीम / मुंबई :

‘वोल्वो’ची बहुप्रतिक्षित ’वोल्वो एक्ससी 60’ ही लक्झरी कार भारतात अखेर लॉन्च झाली आहे. या कारची भारतातील एक्स शोरूमची किंमत 55.10लाख रूपये इतकी आहे. ही कार आउडी क्यू 5, बीएमडब्लू एक्स3, मर्सिडीज बेंझ जीएलसी, जॅग्वार एफ पेस अशा गाडय़ांना जोरदार टक्कर देणार आहे.

‘वोल्वो एक्ससी 60’मध्ये 1969 सीसीचे 4 सिलिंडर ट्वनि टर्बोचाजेड डीझेल इंजिन लावण्यात आले आहे. यामध्ये 4000 आरपीएम वर जास्तीतजास्त 233 बीएचपीची पॉवर आणि 480 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट केला जातो. याच्या इंजिनला 8 स्पीड गिअरट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जोडण्यात आले आहे.

4 झोन क्लायमेट कन्ट्रोल, एअर सस्पेन्शन सिस्टम, 15 स्पीकर ऑडिओ सिस्टम, 9 इंच स्क्रीन, ब्लॅक सॉफ्ट टच डॅशबोर्ड, पॅनोरॉमिक सनरुफ अशी फिचर्स या गाडीत देण्यात आली आहेत.या गाडीत इको, कम्फर्ट, ऑफ रोड, डायनॅमिक आणि इंडिव्हिज्युअल अशी पाच ड्राईव्ह मोडस उपलब्ध आहेत. तसेच सुरक्षेसाठी या गाडीत क्रूज कंट्रोल, पायलट असिस्टम, लेन किपिंग ऍड, पार्क पायलट असिस्टम, 360 डिग्री कॅमेरा व्ह्यू, हिल स्टार्ट असिस्ट असे फिचर्सही देण्यात आले आहेत.