|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मिठारवाडी ते मलेशिया : शशिकांत जगतापची भरारी

मिठारवाडी ते मलेशिया : शशिकांत जगतापची भरारी 

माले /वार्ताहर :

मिठारवाडी (ता. पन्हाळा) येथील शशिकांत बाबासाहेब जगताप यांची एफ.ई.व्ही.इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणेतील कंपनीच्या मलेशियातील शाखा तपासणीसाठी नुकतीच निवड झाली आहे. त्यासाठी ते नुकतेच मलेशियाला रवाना झाले.

      ते मेकनिक इंजिनियर असून, या कंपनीत सिनियर डिझाईनर इंजिनिअर या पदावर कार्यरत आहेत. मलेशिया इथे जाऊन आपल्या कंपनीची पूर्ण तपासणी करून योग्य तो अहवाल पुण्यातील कंपनीकडे सादर होणार आहे. मिठारवाडीसारख्या अतिशय दुर्गम आणि डोंगराळ भागातील एक युवक मलेशियाला तपासणीस म्हणून जातो ही अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब या गावासाठी आणि जगताप कुटुंबासाठी झाली आहे.

     कंपनीने आपल्यावर महत्वपूर्ण कामगिरी दिली असून ती व्यवस्थित पार आहे तसेच आपल्या निवडीमागे आपल्या फाईन इलेफंट व्हन प्रायव्हेट लिमिटेड पुणे कंपनीचे डायरेक्टर व जनरल मनेंजर धर्मेंद्रकुमार सिंघ,वडील बाबासाहेब जगताप व जगताप परिवार यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Related posts: