|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात कोंढव्यात तरूणीवर गँगरेप ; दोघांना अटक

पुण्यात कोंढव्यात तरूणीवर गँगरेप ; दोघांना अटक 

ऑनलाईन टीम / पुणे  :

पुण्यातील कोंढवा परिसरात 23 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण पसार झाल्याची माहिती आहे.

सतिश माने व बालाजी शिंदे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला येरवडा येथील राहणारी आहे.तिचा पती कोंढव्यात राहत असून त्यांचा घटस्फोट झाला आहे.13 डिसेंबर रोजी संध्याकाळी तिचे भावाबरोबर भाडणे झाले.त्यामुळे ती घराबाहेर पडली व रिक्षाने एनआयबीएम रोडवर आली.पतीबरोबर संपर्क साधण्यासाठी तिने तेथील एका सोसायटीच्या वॉचमॅनकडे मोबाईल मागितला.पण त्याने दिला नाही.तेथून चालत जात असताना एक रिक्षा आली.त्यात बसून तिने कोथरूडला जायचे असे सांगितले.तिला एकटीला पाहुन रिक्षा चालकाने मित्राला फोनकरून बोलावून घेतले वाटेत तो मित्र आला त्याने जबरदस्तीने कोंढव्यातील सिद्धार्थ नगरमधील एका खोलीत नेले व त्या मित्राने तिच्यावर रात्रभर आत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान,त्यानंतर रिक्षाचालकाने पीडित महिलेला हडपसर येथील हांडे वाडी येथे एका खोलीत नेऊन दारू पाजली व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने दुसऱया मित्राला बोलून घेतले व तिला सोडायला सांगितले. त्याने तिला कॅम्पमध्ये सोडले. पीडित महिला येरवाडय़ाला रात्री पायी जात असताना पाहिल्यावर पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तिने घडलेला हा प्रकार सांगितला. कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.