|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » हुंदाईची ‘वर्ना ’ इंडियन कार ऑफ द इयर

हुंदाईची ‘वर्ना ’ इंडियन कार ऑफ द इयर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

2018 या वर्षासाठी नव्या हुंदाई वर्ना या गाडीला ‘इंडियन कार ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. भारतातल्या ऑटोमोबईल क्षेत्रात हा पुरस्कार प्रतिष्ठित पुरस्कारांमधला एक समजला जातो.

या पुरस्काराच्या शर्यतीत होंडा डब्लू-व्ही, जीप कंपास,मारूती डिझायर,मारूती इग्निस, रेनो कॅप्टर,स्कोडा कोडिएक, टाटा नेक्सन आणि फॉक्स वेगन या कारचा समावेश होता . हुंदाई वर्नाला 118 पॉइंट मिळाले aतर मारूती डिझायरला 117पॉइंट आणि जीप कंपासला 87 पॉइंट मिळाले आहेत. हुंदाई वर्ना ही मिड साइाज सेडान प्रकारातील कार असून ती होंडा सिटी आणि मारूती सियाज या कारशी बरोबरी साधते.कंपनीने नव्या कारमध्ये डिझाइनला अपडेट केले आहे. कारचा प्रोजेक्टर हेडलँप आणि एलईडी डीआरएल देण्यात आला आहे.यात 16 इंचाचे डायमंड कट एलॉय व्हील बसवण्यात आले आहेत.