|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ऑनलाईन मतदान घेण्याचा विचार : सहारिया

ऑनलाईन मतदान घेण्याचा विचार : सहारिया 

पंढरपूर / प्रतिनिधी

मतदानाचा सध्या टक्का वाढत आहे. यामध्ये इतर देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने मतदान केले पाहिजे. यासंबंधीचा विचार देखिल आहे, असे मत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहारिया आज पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामधामवर पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसिलदार मधुसुदन बर्गे, पोलिस निरीक्षक विठठल दबडे उपस्थित होते.

याप्रसंगी सहा†िरया म्हणाले, सध्या मतदानाची टक्केवारी वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाहिले तर इतर काही देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने मतदान होण्याचा विचार आहे. यासाठी अशा मतदान प्रक्रियेमधील धोमके तसेच इंटरनेट हॅकिग आणि पारदर्शकतेच्sढ मुददे तपासण्याची गरज आहे. याचा संपूर्ण अभ्यास देखिल होणे गरजेचे आहे. तरच संपूर्णपणे ऑनलाईन पध्दतीने भविष्यात मतदान घ्यावे का ? याचा विचार परिपूर्ण होईल, असे देखिल ते यावेळी म्हणाले.

राज्यात नवमतदार वाढावेत. या दृष्टीकोनातून महाविद्यालयामधे प्रवेश प्रकियेच्यावेळी विद्यार्थ्याकडून आपले 18 वर्षे पूर्ण आहे. आणि आपण मतदार नोंदणी करणार असल्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. आणि याचवेळी महाविद्यालयामधून मतदार नोंदणी करून त्यांचे फ्ढाŸर्म निवडणूक विभागाकडे येतील. आणि त्यानंतर त्यांची मतदार नोंदणी होईल, असा नवमतदार नोंदणीचा देशातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रात झाला आहे आणि तो यशस्वी करण्यांचा देखिल प्रयत्न महाविद्यालये, तसेच विद्यापीठे यांच्याकडून झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील 28 हजार संस्थापैकी 80 टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे निर्भयमुक्त निवडणुका या पूर्ण झाल्या असल्यांने आपण मतदारांचे आभारी आहेत. तसेच मतदार जागृतीमुळे महानगरामध्ये मतदारांचा टक्का वाढल्याचे त्यांनी सांगितले.