|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सांकवाळ येथील बेकायदेशीर बांधकाम विषयी पुरातत्व व पुराभिलेक खात्यात निवेदन सादर

सांकवाळ येथील बेकायदेशीर बांधकाम विषयी पुरातत्व व पुराभिलेक खात्यात निवेदन सादर 

प्रतिनिधी/ पणजी

सांकवाळ येथे अवर लेडी ऑफ हेल्थ या चर्चच्या संरक्षक क्षेत्राच्या 100 मीटर आत बांधकाम चालू आहे. जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कुणालाही या भागात बांधकाम करण्याची परवानगी नाही. आणि याबाबत दि. 6 डिसेंबर रोजी गोवा पुरातत्व व पुराभिलेक खात्यात तक्रार नोंद केली होती पण अजूनही यासंदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. अशी माहीती डॉ. कालीदास वायंगणकर यांनी दिली.

सांकवाळ येथे बेकायदेशीर बांधकामा विषयी निवेदन सादर करण्यासाठी आलेल्या डॉ. वायंगणकर यावेळी पत्रकारांशी बोलताना ही माहीती दिली.

दि. 6 रोजी तक्रार करुनही अजूनपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. यासाठी आम्ही खात्याच्या संचालकाला भेटायला आलो असता येथे ती उपलब्ध नाही. त्यामुळे सहाय्यक पुरातत्व अधिक्षक वरद सबनिस यांना यासंदर्भात आम्ही परत एकदा निवेदन सादर केले. तसेच त्यांना या संबधात आवश्यक माहीती दिली. सबनिस यांनी सांगितले की आम्ही सदर तक्रार नगरनियोजन खात्याला पूढे पाठविणार असून चर्चच्या कुठल्याही महत्वाच्या पुरातन वास्तूला हानी होणार नाही याची काळजी खात्यातर्फे घेण्यात येईल. असे डॉ. वायंगणकर यांनी पूढे सांगितले.

हे जे सध्या बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे ते चर्चच्या कमिटीत असलेले काही लोक करत आहे. या बांधकामची विचारपूस केल्यास कुठल्याही प्रकारची माहीती ते देत नाही. तसेच चर्चजवळील भागात प्रवेश देखील देण्यास मनाई करत आहे. याबाबत खुप वेळा लोक रस्त्यावर येऊनही काहीच फायदा होत नाही. अश्यावेळी जर आता पुढे कुढलीही कारवाई खात्यांतर्फे होत नाही तर आम्ही न्यायालयात जाणार असल्याचे डॉ. वायंगणकर यांनी सांगितले.