|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

धनुराशीत शुक्र प्रवेश व चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. रविवार किरकोळ मतभेद संसारात होतील. त्यानंतर मात्र आनंदी रहाल. राजकीय-सामाजिक कार्यात नेटाने कार्य करून दाखवता येईल. डावपेच चांगल्या पद्धतीने टाकता येतील. मान प्रति÷ा वाढेल. व्यवसायात जम बसेल. थकबाकी वसूल करा. नवे काम मिळेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. लवकरच केस संपवा. शेतकरी वर्गाला चांगले दिवस येतील. पाणी व पैसा मात्र जपून ठेवा. शिक्षणात प्रगती होईल.


वृषभ

धंद्यात लक्ष द्या जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. मोह व व्यसन यात अडकू नका. धनुराशीत शुक्र प्रवेश व सूर्य शनि युती होत आहे. सोमवार, मंगळवार अडचणी वाढतील. खर्च वाढेल. महत्त्वाची वस्तू वेळच्या वेळी जागेवर ठेवा. दिवसा पाकीट सांभाळा. राजकीय-सामाजिक कार्यात आळस करून चालणार नाही. आरोप येईल. संसारात वाद व तणाव होईल. अचानक पाहुणे आल्याने धावपळ होऊ शकते. कोर्टकेसमध्ये गाफील राहू नका.


मिथुन

धनुराशीत शुक्र प्रवेश व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. प्रगतीची संधी मिळाली तरी अडचणीतून जावे लागेल. तुमचा उत्साह वाढेल. वरि÷ांची मदत होईल. धंद्यात घाई नको. नवे काम मिळू शकेल. राजकीय-सामाजिक कार्यात अधिकार मिळण्याची शक्मयता आहे. नोकरीत चांगला बदल होऊ शकतो. संमतीबरोबरच घरात गुरुवार, शुक्रवारी वाद व मतभेद होईल. कोर्टाच्या कामात सावधपणे बोला. कलेत प्रगती होईल.


कर्क

धनुराशीत शुक्राचे राश्यांतर व सूर्य, शनि युती होत आहे. तुम्ही ठरवाल एक व करावे लागेल दुसरेच, अशीच वेळ येईल. संताप वाढेल. व्यवसायात खर्च होईल. नवे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक कार्यात टिकात्मक चर्चा तुमच्याबद्दल होईल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या भानगडीने समस्या वाढेल. मित्र-आप्तेष्ट यांच्या वादात मध्यस्थ करण्याची वेळ येईल. कोर्टाच्या कामात चूक संभवते. नोकरीत, शिक्षणात लक्ष देऊन काम करा.


सिंह

तुमच्या मनाची अस्थिरता राहील. तडजोड करण्याची वेळ येईल. धनु राशीत शुक्राचे राश्यांतर व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. तुमचे नावलौकिक झालेले पाहून गुप्त शत्रू कारवाया करण्याचा प्रयत्न करतील. तुमचे काम तुम्ही करा. कोर्टाच्या कामात स्वत: लक्ष द्या. थोरा मोठय़ांचे सहकार्य मिळेल. नातलगांच्या भेटी होतील. सभा संमेलनात सहभागी व्हाल. शिक्षणात कष्ट घ्या, मोठे यश मिळेल. कला क्रीडा विभागात प्रगती होईल.


कन्या

या सप्ताहात तुमचा मानसिक उत्साह टिकून राहील. त्यामुळे कोणतेही कठीण काम करणे शक्मय होईल. धनुराशीत शुक्र प्रवेश सूर्य, शनि युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात कष्ट घ्या. परंतु कोणालाही वर्मी लागेल, असे बोलू नका. आपसात गैरसमज होईल, असे वर्तन करू नका. धंद्यात जम बसेल. शेतकरी वर्गाला फायदा होईल. कदाचित तुम्हाला ज्याची शक्मयता नसेल त्या वस्तूकडून फायदा होऊ शकतो.कोर्टाच्या कामात आळस नको. स्वत: लक्ष घाला.


तुळ

आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. धनुमध्ये शुक्र प्रवेश व चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात मेहनत घेतल्यास मोठा फायदा होईल. शेअर्समध्ये नफा कमवता येईल. स्वत:चा छोटासा तरी धंदा सुरू करा. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येईल.  संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात अभाव वाढेल. दर्जेदार परिचय होईल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा.


वृश्चिक

तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल. तरीही मनावर एखादे दडपण राहील. धनुराशीत शुक्र प्रवेश व चंद्र बुध लाभयोग होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात वर्चस्व राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. प्रवासात नवीन ओळख होईल. धंद्यात जास्त मेहनत घ्या. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. कला क्षेत्रात  प्रगती होईल. खेळतांना दुखापत संभवते. कोर्टकेसमध्ये मार्ग मिळेल. जमिनीसंबंधी कामे विलंबाने होतील.


धनु

तुमच्या राशीत शुक्र प्रवेश व सूर्य शनि प्रतियुती होत आहे. साडेसाती सुरू आहे. रविवार वाद व तणाव होईल. धंद्यात समस्या येईल. पैसा गुंतवतांना घाई नको. गुरुवारपासून संकट कमी होईल. राजकीय, सामाजिक कार्यात चांगले कार्य होईल. दौऱयात यश मिळेल. वाटाघाटी करण्याची वेळ संसारात येईल. संततीचे प्रश्न सोडवता येतील. अविवाहितांना लग्नाचा योग येईल. प्रयत्न करा.


मकर

शुक्राचे राश्यांतर घरातील वातावरण थोडे तणावग्रस्त करणारे असणार आहे. जीवनसाथीबरोबर गैरसमज संभवतात. आठवडय़ाच्या सुरुवातीला खिसा, पाकीट सांभाळा. राजकीय, सामाजिक ठोस मत मांडू नका. शत्रुपक्षाच्या कार्यकर्त्यांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. शेतीच्या कामात थोरा मोठय़ांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय बरोबर ठरतील. आत्मविश्वास वाढविणाऱया घटना आठवडय़ाच्या शेवटी घडतील. वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येईल. प्रवास होईल.


कुंभ

आरोग्यात सुधारणा येईल. नवीन कल्पना सुचतील. मित्रांच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करू शकाल. नवीन नोकरीची संधी मिळेल. गुरुवार, शुक्रवारी खोटे आरोप येऊ शकतात. कोर्टकचेरीच्या कामात सावध रहा. राजकारण व सामाजिक क्षेत्रात वरि÷ आपल्या कामाचे कौतुक करतील. आळस सोडून कामाला लागा. ग्रहांची साथ आता चांगली आहे. त्यामुळे मिळेल ती संधी घेऊन वरची पायरी गाठा. कला क्रीडा क्षेत्रात नावलौकिक वाढेल.


मीन

आपल्या कामाचे कौतुक जरी झाले नाही तरी प्रामाणिकपणे कामे करीत रहा. पुढच्या काळात तुमची प्रगती होणार आहे. आता परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत हाता तोंडाशी आलेला घास काढून दुसऱयाला दिला जाऊ शकतो. आठवडय़ाची सुरुवात चांगली आहे. जीवनसाथीच्या मदतीने धंद्यात फायदा होईल. शेतीच्या कामातही मदत होईल. कर्ज काढून मोठा व्यवसाय तूर्तास सुरू करू नका.