|Sunday, January 20, 2019
You are here: Home » leadingnews » बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोंधळ

बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी गोंधळ 

ऑनलाईन टीम / बुलडाणा  :

बुलडाण्यात नांदुरा येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेआधी दोन गटांमध्ये वाद झाला.त्यामुळे सभेसाठी लावलेल्या खुर्च्यांची फेकाफेकी सुरू झाली.पोलिसांनी वेळीच हस्ताक्षेप केल्याने मोठा गोंधळ टळला आहे.मात्र हा वाद नेमका कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट आहे.

आज दुपारी बुलडाणा जिह्यातील नांदुऱयात मुख्यमंत्र्यांची सभा होणार होती.मात्र सभा सुरू होण्यापूर्वी दोन गटांमध्ये काही कारणाने वाद झाला,याच वादात उपस्थित नागरिकांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरूवात केली.मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत हस्तक्षेप केला आणि तणाव काहीसा निवळला.दरम्यान,या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.काही वेळापूर्वीच सभास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दाखल झाले असून सभा सुरू झाली आहे.

 

 

 

 

Related posts: