|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » झी नाटय़गौरवमध्ये प्रायोगिक नाटकांसाठी 1 लाख पारितोषिक

झी नाटय़गौरवमध्ये प्रायोगिक नाटकांसाठी 1 लाख पारितोषिक 

रंगभूमी ही अनेक कलाकारांसाठी खास असते. टीव्ही, सिनेमा या माध्यमांसोबत रंगभूमीवर एक तरी नाटक करावं हे वेड नसलेला कलावंत विरळच. एखाद्या संवादाला पुढच्याच क्षणी मिळणारी रसिकांची टाळी ऐकणं ही तर रंगभूमीवरच्या कलाकारांसाठी पावतीच. अशा नाटय़कर्मींचा, नाटय़संस्थांचा गौरव करण्यासाठी झी वाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून कौतुकसोहळा आयोजित करते. यंदाही या नाटय़गौरव सोहळय़ाचे वेध तमाम रंगकर्मी आणि नाटय़वर्तुळाला लागले आहेत. झी नाटय़गौरव पुरस्काराचा तो नेत्रदीपक सोहळा, नव्या नाटकांमधील विषयांचे वैविध्य, प्रयोग, दिग्दर्शकांची कमाल आणि प्रचंड उत्सुकतेनंतर मिळणारा उत्कृष्टतेचा मुकूट हे सगळंच अनोखं.

झी नाटय़गौरव पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळवण्यासाठी यंदा चांगलीच चुरस आहे. यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्वोकृष्ट प्रायोगिक नाटकाला झी तर्पे 1 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. झी मराठी नेहमीच मराठी नाटकांना प्रोत्साहन देत आली आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱयांसाठी 1 लाखाचे पहिले पारितोषिक नक्कीच आणखी मेहनत घेण्याचे कारण ठरेल. यावर्षी या स्पर्धेला ऑनलाइन टच असणार आहे. या पुरस्कारासाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत 10 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आहे. नावनोंदणीसाठी www.zeemarathi.com/zgp2018 या लिंकवर अर्ज उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. यावर्षी रंगभूमीवर आलेल्या नाटय़संस्थांचा सहभाग या स्पर्धेत असेल. नाटय़सफष्टीतील तज्ञ आणि अभ्यासू परीक्षकांकडून झी नाटय़गौरव पुरस्कारासाठी विविध विभागातील नामांकने व विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियम आणि अटी वेबसाइटवर आहेत.