|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » ईव्हीएम फेरफारबाबतचे आरोप चुकीचे : मुख्य निवडणूक आयुक्त

ईव्हीएम फेरफारबाबतचे आरोप चुकीचे : मुख्य निवडणूक आयुक्त 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ईव्हीएम मशिन्समध्ये घोटाळे होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार झालेला नाही. असा फेरफार होणे अशक्मय आहे. मात्र, काही विरोधी पक्षांकडून प्रामुख्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून इव्हीएममध्ये फेरफार होत असल्याचा आरोप होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्य ज्योती यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना हे स्पष्ट केले. गुजरातमध्ये व्हीव्हीपॅटचा (व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट टेल) वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आपण कोणाला मत दिले हे मतदारांना समजते, त्यामुळे असे आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.