|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » छगन भुजबळांच्या जामीनवर आज सुनावणी

छगन भुजबळांच्या जामीनवर आज सुनावणी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

गेल्या 21 महिन्यांपासून आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांतर्गत् कैदेत असलेले माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने मागच्या महिन्यात घटनाबाह्य ठरवले आहे. त्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळण्याची दाट शक्मयता आहे. या पार्श्वभूमीवर पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भुजबळ यांच्याविरुद्ध मनी लाँडरिंग कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्यातील कलम 45 च्या तरतुदीमुळेच भुजबळ यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.