|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » दोन्ही राज्यांतील निकालांनी नाराज नाही : राहुल गांधी

दोन्ही राज्यांतील निकालांनी नाराज नाही : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या निकाल हाती आल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून राज्यांच्या निकालांनी आपण नाराज नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

हिमाचल प्रदेशात भाजपने विजय मिळवल्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एका राज्यातील सत्ता गेली आहे. तर गुजरातमध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे. भाजपने बहुमतापेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच निवडणूक असल्याने या दोन्ही राज्यांच्या निकालांनी आपण नाराज नसल्याचे राहुल यांनी सांगितले.