|Saturday, August 24, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

पौष महिन्यात लग्न, मुंज वगैरे मंगलकार्ये का करीत नाहीत? (उत्तरार्ध)

पौष मासाविषयी जे काही समज गैरसमज आहेत, त्यामागील कारणमीमांसा लोकांना माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुराणातील काही संदर्भ येथे दिलेले आहेत. भागवत पुराणातील 15 व 16 व्या अध्यायात या बाबतची कथा आहे. हल्लीच्या पिढीला त्या कितपत रुचतील हा प्रश्न आहे. पौष महिना हा तसा पाहिला असता शुभ महिना आहे. गुरुपुष्यामृत योग हा सर्व श्रे÷ राजयोग मानला जातो. त्या योगावर सुवर्ण खरेदी केल्यास समृद्धी येते अशी समजूत आहे. नक्षत्राचा राजा असलेल्या पुष्य नक्षत्राच्या अंमलाखाली हा गुरुपुष्यामृत अमृत योग येतो. त्याच नक्षत्राच्या आधिपत्याखाली हा महिना येतो. त्यामुळे तो अशुभ कसा म्हणावा? असाही प्रश्न पडतो. त्यामुळे अशुभ महिना म्हणून महत्त्वाची कामे पुढे ढकलू नयेत.

श्री रेणुकादेवीला या महिन्यात वैधव्य आल्याने तिची ओटी भरणे, कंकण अर्पण करणे या महिन्यात करीत नाहीत. श्री दत्तात्रेयांचा परमभक्त  असलेल्या एका क्षत्रिय राजाने शत्रूपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला. दत्तात्रेयानी त्याला वरदान म्हणून एक हजार हात प्रदान केले. त्यामुळे त्याला लोक सहस्त्रार्जुन अथवा सहस्त्रबाहु असे म्हणू लागले. तो एकदा शिकारीसाठी जंगलात गेला असता महातपस्वी जमदग्नी ऋषींच्या आश्रमात पोचला. जमदग्नी ऋषींनी गोमाता कामधेनुच्या प्रतापाने या क्षत्रिय राजाचे व त्याच्या सर्व सैन्याचे यथोचित आदरातिथ्य केले. ऋषीचे ऐश्वर्य आपल्यापेक्षा मोठे असल्याचे पाहून त्याने उर्मटपणे त्यांचे आदरातिथ्य झिडकारले व गोमाता कामधेनुचेच अपहरण केले. काहीवेळाने जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात आले असता त्यांना सारा वृत्तांत समजला. अत्यंत क्रोधाविष्ट होऊन त्यांनी सहस्त्रार्जुनाच्या सैन्यावर आपल्याकडील दैवी अस्त्र परशुसह चाल करून त्याला पराभूत केले. या पराभवाचा सूड घेण्यासाठी सहस्त्रार्जुनाच्या मुलांनी आश्रमात शिरून जमदग्नि मुनींचा शिरच्छेद केला, हे पाहताच जमदग्नी पत्नी रेणुका पती शोकाने विलाप करू लागली. पित्याच्या हत्येने व्यथित झालेल्या परशुरामांनी दिवंगत पित्याचे मस्तक आणून त्यांच्या धडाला जोडले व आपल्या तपस्येच्या बळावर यज्ञयागादी करून भगवंताचे यथासांग पूजन केले. त्या पुण्याईच्या बळावर महषी जमदग्नी जिवंत झाले. माता रेणुकेस पुन्हा सौभाग्य प्राप्त झाले, म्हणून मार्गशिर्ष पौर्णिमेस विसर्जित केलेले माता रेणुकेचे सौभाग्यलंकार पुन्हा पौष पौर्णिमेस तिला अर्पण केले जातात. या दिवसापासून देवीची ओटी भरणे, वगैरे कार्यक्रम पूर्ववत सुरू केले जातात. हा एक महिन्याचा काळ त्यासाठीच विवाहादी शुभ कार्यासाठी वर्ज्य मानला जातो. ही घटना देवीशी संबंधित आहे, पण काही स्त्रिया त्याचा विपरीत अर्थ करून घेतात. हातातील बांगडय़ा फोडतात. कपाळाचे कुंकू पुसून टाकतात व आपण विधवा आहोत अशी समजूत करून घेतात, पण हे योग्य नव्हे. पती जिवंत असताना अशा अशुभ गोष्टी केल्यास कावळा बसायला व फांदी मोडायला गाठ या म्हणीप्रमाणे खरोखरच वैधव्य येण्याची शक्मयता असते. जमदग्नींना जिवंत करण्याचे सामर्थ्य परशुरामात होते पण आता तशा सामर्थ्याचे महापुरुष नाहीत, त्यामुळे महिला वर्गाने या बाबतीत कोणताही अतिरेक करू नये. अन्यथा स्वत:च अरिष्टाला आमंत्रण दिल्यासारखे होते. देवाधर्माचा अथवा धार्मिकतेचा दंभ अथवा अतिरेक करू नये. कोणताही महिना अथवा दिवस वाईट नसतात सर्व काही देवानेच निर्माण केलेले आहे. मग पौष महिन्यात मंगल कार्ये केली तर काय बिघडते असा प्रश्न अनेकजण विचारतात त्यासाठीच वरील संदर्भ दिलेला आहे.

 

मेष

विद्वान सर्वत्र पुज्यते ही उक्ती तुमच्या बाबतीत या सप्ताहात खरी ठरेल. अकल्पित भाग्योदय होईल. शत्रू आपणहून थंड पडतील. महत्त्वाच्या अडचणीच्यावेळी शासकीय अधिकारी सहाय्य करतील. योग्य विचारशक्तीमुळे तुमचे मुद्दे खोडणे काहीजणांना कठीण जाईल. पण शेजारी, नातलग व भावंडे यांच्याशी पटणार नाही. एखाद्या भावंडाची जबाबदारी सांभाळावी लागेल.


वृषभ

कुणाचाही विरोध सहज मोडून काढाल. काही जुनाट आजारावर  कायमस्वरुपी मार्ग निघेल. प्रेमप्रकरणापासून दूर राहिल्यास चांगले. अन्यथा नको ते आरोप येवू शकतील. बाधिक दोष, विषारी किटक, सर्पदंश यापासून धोका.  वडिलोपार्जित संपत्ती असेल तर त्यात घोटाळे निर्माण होतील. एखाद्याला मदत  करायला जावून संकटात पडाल. पोलीस केसेसपासून जपा.


मिथुन

हाती घेतलेल्या सर्व कामात चांगले यश मिळवाल. पण मित्रमंडळींच्या सल्ल्यापासून दूर रहावे. अन्यथा गोत्यात याल. शिक्षणात अडथळे येतील. संततीपासून त्रास होऊ शकेल. कलाकौशल्याच्या कामात उत्तम योग. पोटात व कंबरेत काहीतरी होत आहे असे वाटत राहील. प्रवास घडतील. वैवाहिक जोडीदाराच्या नातेवाईकांकडून काही अडचणी उदभवतील.


कर्क

मोठमोठे उद्योगधंदे नोकरी यात मनासारखे यश मिळवाल. पुढे घडणाऱया काही घटनांची पूर्वसूचना मिळेल. आठवडा सर्व बाबतीत यश देणारा आहे. नोकरी व्यवसायात जर काही समस्या असतील तर त्या सुटतील. देण्याघेण्याच्या व्यवहारातून संघर्ष होण्याचे योग दिसतात. लांबचे प्रवास, सहली टाळण्याचा प्रयत्न करा.


सिंह

सहज केलेली चेष्टा थट्टामस्करी अंगलट येईल, काळजी घ्यावी. प्रवासात त्रास कागदोपत्री व्यवहार मात्र यश देणारे ठरतील. मुलाबाळांच्या भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. जे काम हाती घ्याल त्यात दैवी  साहाय्याचा भाग राहील. काहीजणांना अनपेक्षित बदलीला सामोरे जावे लागेल. कुणालाही शब्द देताना त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्या.


कन्या

दैवी कार्यासाठी प्रवास घडतील. देवधर्माच्या कृत्यात चांगले यश मिळेल. देवघर ईशान्येला असेल तर निश्चित या आठवडय़ात शुभ व लाभदायक घटना घडतील. सरकारी कामात मोठे यश देणारा सप्ताह. आतापर्यंत खोळंबलेली अनेक कामे गतिमान होतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने चांगले योग. घरगुती समस्या कमी होतील.


तुळ

तुमचे अनेक किचकट प्रश्न या आठवडय़ात सुटतील पण त्या दृष्टीने तुमचे प्रयत्नही हवेत. धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल योग. संततीच्या दृष्टीने चांगले अनुभव येतील. एखाद्याचे भले करण्यास जावे तर त्यानेच आपल्यावर नको ते आरोप घालावेत असे प्रकारही यावेळी घडण्याची दाट शक्मयता. स्वत:चा बचाव करून इतराना सहाय्य करा.


वृश्चिक

अचानक धनलाभ. संततीचा उत्कर्ष, प्रवासात लाभ नवनव्या कार्यक्षेत्रात प्रवेशाच्या दृष्टीने चांगले योग.वाहन जपून चालवा. दुर्घटना घडण्याची शक्मयता राहील. आरोग्य व शिक्षणाच्या दृष्टीने अनुकूलता लाभेल. महत्त्वाची सरकारी कामे मात्र कामे जरा  जपून करावीत. उत्तरार्धात अनेक महत्त्वाच्या घटनांचा शुभारंभ होईल.


धनु

काही जणांच्या आगमनामुळे घरात सतत अस्वस्थ वाटत राहील. मुलाबाळांच्या दृष्टीने जरा त्रासदायक. पण धनलाभ व इतर बाबतीत मोठे यश अनेक महत्त्वाचे जटील प्रश्न सोडविण्यास अनेकजण पुढे येतील. धनलाभाच्या नवनव्या संधी येतील. काही गुप्तशत्रुकडून महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होतील.


मकर

तुमच्याबद्दलचे सर्व गैरसमज दूर होतील. अवघड कामाची सुरुवात करू शकाल. संसारिक सौख्यात वाढ होईल. न जुळणारे लग्न ठरेल. बोलण्या चालण्यातून काही नव्या समस्या निर्माण होतील. त्यासाठी विचारपूर्वक वागावे. एखादा गंभीर रुग्णाला मदत करण्याची वेळ येईल.शेजारी व नातेवाईक यांच्याशी असलेले संबंध सुधारतील.


कुंभ

एखाद्या अति महत्त्वाच्या व कठीण कामात यश मिळेल. पण किरकोळ कारणासाठी मोठे खर्च  करावे लागतील. वर्षसमाप्तीच्या पंधरवडय़ात विचित्र घटना घडतील. अपेक्षा नसताना एखादी महत्त्वाची शुभ वार्ता ऐकू येईल.  वास्तु संदर्भात चांगले योग पण सरकारी कामे परमिशन महत्त्वाच्या वाटाघाटी करताना काळजी घ्या.


मीन

धनलाभाच्या बाबतीत अनुकूलता लाभेल व मुलाबाळांचा भाग्योदय होईल. वैवाहिक जीवनाला शुभ कलाटणी देणारे योग. अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. भावंडांत वितंडवाद होतील. मालमत्तेच्या वाटण्यासंदर्भात वादावादी वैवाहिक जीवनात संशयी वातावरणामुळे काही तरी गोंधळ उडण्याची शक्मयता. मन शांत ठेवून वागणे आवश्यक व्यवसायाच्या बाबतीत चांगले योग.