|Saturday, April 20, 2019
You are here: Home » उद्योग » ‘टाटा स्काय’ची नवीन इंटरऍक्टिव्ह सेवा

‘टाटा स्काय’ची नवीन इंटरऍक्टिव्ह सेवा 

पुणे / प्रतिनिधी :

टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेट डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्मने एफ द काऊच (एफटीसी) ब्युटी स्टुडिओ या सुनील शेट्टी यांच्या उपक्रमासह भागीदारी करत आपली नवीन इंटरऍक्टिव्ह सेवा सुरू केली आहे.

याबाबत बोलताना टाटा स्कायच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी पल्लवी पुरी म्हणाल्या, टाटा स्काय ब्युटी ही सेवा ग्रूमिंग, स्टायलिंग आणि काळजी घेण्यातील कौशल्ये वाढवण्यासाठी (डीआयवाय) तसेच महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. यादृष्टीने टाटा स्कायने एफटीसी ब्युटी स्टुडियोशी हातमिळवणी केली असून, या स्टुडिओच्या माध्यमातून सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रातील ख्यातनामतज्ञ या सेवेत उपलब्ध होतील. सुनील शेट्टी म्हणाले, फिटनेस आणि ऍक्टिंग अड्डा सुरू केल्यानंतर आता टाटा स्कायसोबत एफटीसी ब्युटी स्टुडिओच्या रुपाने आणखी एक सहयोग जोडला जात आहे.

 

 

Related posts: