|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उदगावमध्ये सांडपाणी मोरीत सिंमेट ओतले

उदगावमध्ये सांडपाणी मोरीत सिंमेट ओतले 

वार्ताहर /उदगाव :

उदगांव (ता. शिरोळ) येथील गावाचे साडपाणी चिंचवाड मार्गावरुन जुना हरिजन वाडय़ातून गावाच्या वेशीत असलेल्या नाल्यात जात होते. या सांडपाण्यामुळे सहा शेतकऱयांची तीन एकर शेती खराब झाल्याने मंगळवारी रात्री सांडपाणी जात असलेल्या मुख्य मोरीत सिंमेट कॉक्रीट ओतल्याने निचरा होणारे सांडपाणी तुंबत आहे. त्यामुळे दलितवस्तीत दुर्घधी येत आहे.

उदगांव येथील नदीवेस जवळील रावसाहेब मगदुम, राजकुमार मगदुम, प्रधान मगदुम, सर्जेराव जाधव, नरसू चौगुले, शंकर मगदुम यांच्या तीन एकर शेतात गावाचे सांडपाणी जात असल्याने शेती खराब झाली आहे. त्यामुळे राजकुमार मगदुम यांनी उदगाव ग्रामपंचायतला वारवांर लेखी व तोंडी हा प्रश्न निकालात लावण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतने लक्ष देत नसल्याने अखेर राजकुमार मगदुम यांनी मंगळवारी रात्री गावाच्या नदीवेशीत असलेल्या मुख्य मोरीत सिंमेट कॉक्रीट ओतल्याने गावातील सांडपाण्याचा निचरा बंद झाला, त्यामुळे सांडपाणी आता दलितवस्तीत तुंबत आहे.

उदगाव ग्रामपंचायतला अनेक वर्षापासुन हा प्रश्न निकालात न लावल्याने अखेर संतप्त शेतकऱयांनी सांडपाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱयांनी आता सांडपाणी वाहत असलेल्या मुख्य मोरीत सिंमेट कॉक्रीटचा बांध घातला. त्यामुळे आमच्या दलित वस्तीत पाणी तुंबत असुन दुर्घधी येत आहे. त्यामुळे हा प्रश्नं आज न सोडविल्यास ग्रामपंचयातला कुलूप घालणार असल्याचे जुना हरिजन वस्तीतील नागरिकांनी सांगितले आहे.

Related posts: