|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » केंद्रीय मंत्री अंनत गिते यांच्या गाडीला अपघात

केंद्रीय मंत्री अंनत गिते यांच्या गाडीला अपघात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झाला.या अपघातात गिते यांच्या डोक्या किरकोळ दुखापत झाली आहे.गिते सुखरूप आहेत. गिते हे खोपोलीजवळ पालीकडे जात असताना पालीजवळ त्यांचा आपघात झाला.

गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलड गाडीसमोर दुचाकीस्वार आडवा आला.त्यामुळे पोलिसांच्या गाडीचा अचानक ब्रेक दाबण्यात आला. त्यामुळे मागे असलेली गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हॅनला धडक दिली.तर गिते यांच्या मागे असलेल्या दुसऱया एका पायलट व्हॅनने गिते यांच्या गाडीला धडक दिली.या अपघातात गिते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली.अनंत गिते रायगडमधील शिवसेनेचे खासदार आहेत.

 

 

 

 

Related posts: