|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भविष्य निर्वाह निधी ही सामाजिक सुरक्ष : एम. डी. पाटगावकर

भविष्य निर्वाह निधी ही सामाजिक सुरक्ष : एम. डी. पाटगावकर 

पुलाची शिरोली / वार्ताहर :

     भविष्य निर्वाह निधी ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे . असे मत भविष्य निर्वाह निधीचे सहाय्यक आयुक्त एम. डी. पाटगावकर यांनी व्यक्त केले. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन  (स्मॅक) तर्फे आयोजित ‘भविष्य निर्वाह निधी योजना व नवे बदल’ या विषयावरील चर्चासत्रास ते मार्गदर्शन करत होते. स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भविष्य निर्वाह निधीचे प्रवर्तन अधिकारी संतोष पोळ व स्मॅक आयटीआयचे माजी अध्यक्ष दिपक पाटील हे प्रमुख उपस्थित होते.

     पाटगावकर म्हणाले, भविष्य निर्वाह निधीची स्थापना 1952 साली  झाली आहे. गेल्या पासष्ठ वर्षात कुटुंब निवृत्ती, कर्मचारी निवृत्ती पेन्शन योजना अशा विविध योजनांचा लाभ सर्व स्तरातील कामगार व कर्मचाऱयांना मिळाला आहे. सन 2016 पासून अनेक नवे बदल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘उमंग’ हे मोबाईल ऍप आहे. यामुळे कोणत्याही भविष्य निर्वाह निधी खातेदारास ऑनलाईन पासबुक, ऑनलाईन क्लेम, तसेच संबंधित खातेदार हा उद्योगाच्या कोणत्या वर्गवारीत येतो याची माहिती त्याला त्याच्या मोबाईलवर मिळू शकेल. शिवाय त्याचे खाते त्याला स्वतःला हाताळता येईल, असे पाटगावकर यांनी सांगितले.

     विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे प्रवर्तन अधिकारी संतोष पोळ यांनी दिली. अध्यक्ष राजू पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव टी. एस. घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.

     यावेळी  भारत उद्योगचे बाळासाहेब काटकर, टय़ुलिप कास्टिंगचे संदिप जंगम, के ऍण्ड के चे सुधाकर चौगले, टफ कास्टिंगचे वाय. एन. पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे सचिव प्रदीप व्हरांबळे आदी उपस्थित होते.  संतोष पोळ यांनी आभार मानले.