|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणे भंडारी समाज समितीचे 27 रोजी धरणे आंदोलन

पेडणे भंडारी समाज समितीचे 27 रोजी धरणे आंदोलन 

प्रतिनिधी /पेडणे :

गोमंतक भंडारी समाज पेडणे तालुका तर्फे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती, अन्य योजना व कूळ-मुंडकार खटले यांचे निकाल पेडणे मामलेदार कार्यालयातून लवकरात लवकर लागत नाहीत. त्यामुळे पेडणे तालुका गोमंतक भंडारी समाजाच्यावतीने 27 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 ते सायं. 4.30 या वेळेत धरणे आंदोलन येथील सरकारी संकुलासमोर करण्यात येणार आहे, अशी माहिती येथे भंडारी समाजबांधवांच्या आयोजित बैठकीत देण्यात आली.

सदर बैठक तालुका अध्यक्ष उमेश तळवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पेडणे तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सर्व मतभेद बाजूला ठेवून एका झेंडय़ाखाली येण्याचे आवाहन करण्यात आले.

ओबीसीसाठी असलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तसेच कूळ-मुंडकार संबंधीचे खटले हे गेली अनेक वर्षे सरकारी कार्यालयात धूळखात पडून आहेत. ते सर्व खटले लवकरात लवकर निकालात काढून कूळ-मुंडकारांना न्याय द्यावा, असे दोन ठराव संमत झाले. त्यानुसार बुधवार दि. 27 रोजी धरणे आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत पेडणेच्या नगराध्यक्ष उषा नागवेकर, नगरसेवक प्रशांत गडेकर, केंद्रीय समिती सदस्य मोहन तळवणेकर, महादेव गवंडी, तालुका उपाध्यक्ष गुंडू राऊळ, खजिनदार रोहिदास भाटलेकर, उपखजिनदार गजानन गडेकर, युवा अध्यक्ष रुद्रेश्वर नागवेकर, सल्लागार, सुरेश माशेलकर, उत्तम कशालकर, प्रदीप कोरगावकर, किशोर किनळेकर, अनिल गर्डेकर, महेश कशालकर, किशोर नागवेकर, पंढरी आरोलकर, विश्वास नारोजी, मनोज हरमलकर, उदय हरमलकर, राजेश अमेरकर, दयानंद किनळेकर, उदय केरकर, शांताराम कळंगूटकर, यशवंत पालयेकर, सुभाष गडेकर, नारायण मयेकर, किशोर आसोलकर आदींनी विविध सूचना केल्या.

स्वागत व प्रास्ताविक प्रशांत गडेकर यांनी केले आभार उषा नागवेकर यांनी मानले.

Related posts: