|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 26 डिसेंबर 2017

आजचे भविष्य मंगळवार दि. 26 डिसेंबर 2017 

मेष: मुलेबाळे व इतर बाबतीत अपेक्षित वृत्त समजेल, अडचणी कमी होतील.

वृषभः राहत्या जागेसंदर्भातील त्रास संपेल, त्रास कमी होवू लागतील.

मिथुन: नोकरी विषयक बोलणी, मुलाखती, व्यवसाय या बाबतीत शुभ.

कर्क: रखडलेल्या अनेक गोष्टी साध्य होतील, कर्जाचा बोजा उतरेल.

सिंह: उत्साही व्यक्ती भेटतील, एखादे मोठे काम होईल.

कन्या: आर्थिक सुधारणा होतील, कुणाचे मन दुखावू नका.

तुळ: तुमच्या कलेला योग्य तो आदर प्राप्त होईल.

वृश्चिक: प्रगत विचारांचा चांगला प्रभाव पडलेला दिसेल.

धनु: ऐनवेळी मार्ग सापडल्याने आर्थिक गंडांतर टळेल. 

मकर: इतरांच्या भांडणात मध्यस्थी करु नका, निष्कारण अडकाल.

कुंभ: व्यावसायिक अडचणी दूर होतील, आर्थिक लाभ.

मीन: कलागुणांचे सर्वत्र कौतुक होईल, जीवनात मोठा बदल.