|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वाजपेयींची विश्वासार्हता मोदींमध्ये नाही : दलवाई

वाजपेयींची विश्वासार्हता मोदींमध्ये नाही : दलवाई 

खा. हुसेन दलवाई यांचे मोदींवर टीकास्त्र

प्रतिनिधी/ सोलापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासनाचा भडीमार करत आहेत. मात्र यापूर्वी भाजप सत्तेवर आले होते, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी कधीच सर्वसामान्य लोकांना खोटी आश्वासने दिली नाहीत. पण मोदी सर्रास खोटे बोलून भुलवतात, असा आरोप खासदार हुसेन दलवाई यांनी केला.

काँग्रेस भवन येथे सोमवारी खासदार हुसेन दलवाई यांची पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले हेते. त्यावेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष प्रकाश वाले, प्रा. प्रकाश सोनवणे, माजी महापौर नलिनी चंदेले, धर्मा भोसले, युसुफ्ढ अन्सारी, असिफ्ढ नदाफ्ढ, मन्सूर शेख, नागनाथ कदम, तिरूपती परकीपंडला आदी उपस्थित होते.

दलवाई म्हणाले, भाजप सरकार नेहमी गरीबांच्या विरोधात का राहते? आज देशातील परिस्थिती खूपच भयावह आहे. गरीबांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची अडवणूक केली जाते. शिष्यवृत्ती नाही मिळाल्यास गरीबांची मुले शिकायची कुठे? आज अनेक शाळा बंद पडत आहेत. बहुजन समाजाच्या हातून शिक्षण हिरावून घेण्याचा डाव भाजप करत आहे. पूर्वीप्रमाणे शिक्षण विशिष्ठ वर्गाकडे ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजरातमध्ये काँग्रेसनी भाजपला चांगली टक्कर दिली. यासाठी काँग्रेसने चांगल्या उमेदवारांना उमेदवारी दिली होती. परंतु भाजपने  जातीचे राजकारणाची भीती निर्माण केल्यामुळेच काँग्रेसला थोडय़ा फ्ढरकाने मागे पडावे लागले. नाहीतर गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आले असते. हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीचा पराभव काँग्रेसने मान्य केला असल्याचेही खा. दलवाई यांनी केला आहे.

               शेतकऱयांवर शेतमजूर होण्याची वेळ

भाजप सरकारने भांडवलशाही अर्थव्यवस्थेला पोसत आहे. यामुळे आजच्या शेतकऱयांना आपली शेती विकण्याची वेळ आली आहे. कारण बाजारामध्ये शेतकऱयांच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. शेतकऱयांचे अनेक प्रश्न आहेत पंरतु शेतकऱयांच्या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे आपल्या देशातील शेतकऱयांवर शेतमजूर होण्याची वेळ आली असल्याचे खा. यांनी लक्ष वेधले.