|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी एकास अटक

बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी एकास अटक 

वार्ताहर / पणजी

बेळगावहून बेकायदेशीर गोमांस (बिफ) घेऊन येणाऱया वाहनाची पणजीतील पाटो कॉलनीच्या कठडय़ाला जोरदार धडक दिल्यानंतर बेकायदा गोमांसची तस्करी होत असल्याचे एका छायाचित्रकाराच्या जागरुकतेमुळे उघडकीस आले. याप्रकरणी एका संशयिताला येथील पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटना सोमवारी पहाटे 6 वा. उघडकीस आली. सुभानी देसाई असे संशयिताचे नाव आहे.

या घटनेची माहिती अशी की, नाताळ सणानिमित्त गोव्यात गोमांसची मोठय़ा प्रमाणात मागणी होत आहे. त्याप्रमाणे जीए. 03. टी. 9835 क्रमांकाच्या बोलेरो मालवाहू वाहनातून सुमारे 1300 किलो गोमांस बेळगावहून गोव्यात आणण्यात येत होते. दरम्यान पणजीतील गोमांस विक्रेत्याला हे मांस देण्यासाठी वाहन चालक पाटो येथील नो एन्ट्री रस्त्यावरून येत होता. यावेळी त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने बोलेरो वाहनाचीपाटो येथील सरकारी वसाहतीच्या मुख्य दरवाजाच्या बाजूच्या कठडय़ाला जोरदार धडक दिली. त्यामुळे वाहनाचे बरेच नुकसान झाले.

या वाहनात तिघे जण होते. त्यातील दोघा जणांनी घटनास्थळावरून पलायन केले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पंचनामा करून वाहन बाजूला करण्यात येत होते. यावेळी छायाचित्रकाना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी छायाचित्रे काढली. त्यामुळे खऱया पोलीस तपासाला सुरुवात झाली.

याबाबतची माहिती हनुमंत परब व त्यांच्या साथीदारांना कळताच गोमांस संबंधी कोणताच रितसर कागदपत्रे नसल्याने त्यांनी पणजी पोलिसात तक्रार नोंद केली. दरम्यान पणजी पोलिसांनी सुमारे 1300 किलो गोमांस व वाहन जप्त केले. संशयिताविरोधात भादंसं 428, 429 तसेच 1960 गुरे कत्तल विरोधी कायदा 3,5,8 व 9 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. वाहन चालक सुभानी देसाई याला अटक केली आहे.