|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वेलिंग येथे ‘कला मंथन’ कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद

वेलिंग येथे ‘कला मंथन’ कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद 

प्रतिनिधी/ म्हार्दोळ

शांतादुर्गा क्रीडा आणि सांस्कृतिक क्लब, वेलिंग गोठण आणि कला व संस्कृतीक संचालनालय, गोवा राज्य यांच्या सयुक्त विद्यमाने ‘कला मंथन’ कार्यक्रम नुकताच गोठण येथील श्री साई पादुका मंदिरात उत्साहात झाला.

   कार्यक्रमाचे उद्घाटन कला व सांस्कृतिकमंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी त्याच्या सोबत चित्रकार, नाटय़कलाकार श्रीधर कामत बांबोळकर, सरपंच मंगलदास गावडे, संगीतकार नितीन म्हार्दोळकर, लोककलाकार कांता गावडे, व्हिपीके सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे, उद्योजक रुपेश नाईक,  व्हिपीकेचे संचालक रामा गावडे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विठोबा गावडे, दत्तानंद गावडे, प्रभात वेलिंगकर यांच्या हस्ते होणार आहे.

  कलाकारांनी आपल्या कले बरोबरंच शिक्षणही घेण गरजेचे आहे. आई-वडीलानी आपल्याला शिक्षण दिले म्हणून आम्ही आज ताट मानेने जगत आहोत. ज्याच्याकडे शिक्षण आहे तो सर्वांत श्रीमंती माणूस आहे असे उद्गार कला व संस्कृतीक मंत्री गोविंद गावडे यांनी वेलिंग येथील शांतादुर्गा क्रीडा आणि सांस्कृतिक क्लब यांनी आयोजित केलेल्या कला मंथक कार्यक्रमास काढले. वेलिंग गावामध्ये घराघरात कलाकारांनी जन्म घेतला आहे. गावातील संस्थानी विविध कार्यक्रम आयोजित करुन नविन कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. दुसऱयांसाठी जो काम करतो त्यांच्या पदरी यश नाक्किच मिळणार. कलाकारांना प्रोत्साहन देणाऱया संस्था बरोबर मी सदैव असणार असे गावडे यांनी सांगितले.

  विविध कार्यक्रम आयोजित करुन कलाकारांना कलेचे व्यासपिठ दिले पाहिजे. कलेने सर्व क्षेत्रामध्ये चैतन निर्माण केले आहे. आपल्या पुर्वजांनी आपली सांकृती ठिकवून ठेवली आहेत ती आपण पुढे नेली पाहिजे असे श्रीधर कामत बांबोळकर यांनी सांगितले. परिक्षेत क्रीडाचे गुण विद्यार्थ्यांना दिले जाते त्याच प्रमाणे कला क्षेत्रामध्ये भाग घेणाऱया विद्यार्थ्यांना गुण देण्याचे काम संकृतीक मंत्री गोविंद गावडे यांनी हाती घेतलेले आहे असे बांबोळकर म्हणाले.

 मंगलदास गावडे, अशोक गावडे, कांता गावडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. डॉ. विठोबा गावडे यांनी संस्थेचा आढावा घेतला. आभार प्रदर्शना नंदर स्पर्धाना सुरुवात झाली.