|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेलापूरजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बरमार्गावरील अप आणि डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 9.55 वाजता बेलापूर इथे डाउन मार्गावर ओव्हर हेड वायर तुटल्याने पनवेल-वाशी अप डाउन वाहतूक बंद झाली आहे. 4 दिवसीय ब्लॉक घेऊन देखील 5 व्या दिवशी पुन्हा लोकल रखडल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.

याचा फटका ट्रान्स हार्बर मार्गालाही बसला असून तेथे प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, सीएसटी ते वाशीदरम्यान वाहतूक सुरू असल्याचं समजते आहे. दरम्यान, बिघाड दुरूस्त करण्याच्x काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बिघाड दुरूस्त होईल, अशी माहिती पनवेल लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.हार्बरचे वेळापत्रक कोलमडल्याने वेळेत ऑफिस गाठता यावे म्हणून अनेक प्रवाशांनी बसने प्रवासास सुरुवात केली आहे. तर काही प्रवाशांनी खाजगी वाहनांनी प्रवास करण्यास प्राधान्य दिले आहे.