|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » रूपाणींनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

रूपाणींनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

विजय रुपाणी यांनी आज दुसऱयांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांनी त्यांना पदाची शपथ दिली. रुपाणी यांनी दुसऱयांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. तसेच नितीन पटेल यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अहमदाबादमधील गांधीनगर येथील सचिवालयाच्या मैदानावर आज गुजरात मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल कोहली यांनी विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रिपदाची, तर नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी नितीनकुमार पटेल, भूपेंद्रसिंह चुडासामा, रणछोडभाई फालडू, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गणपत वसावा, जयेश रादडिया, दिलीप ठाकोर आणि इश्वर परमार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर प्रदीपसिंह जाडेजा, परबत पटेल, जयद्रथसिंह परमार, पुरुषोत्तम सोलंकी, बच्चूभाई खबाड, इश्वरसिंह पटेल, वासणभाई गोपालभाई, विभावरी दवे, रमणलाल नानूभाई, किशोर कनानी यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.