|Thursday, May 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजकारण प्रवेशाची घोषणा 31 रोजी !

राजकारण प्रवेशाची घोषणा 31 रोजी ! 

सुपरस्टार रजनीकांत यांनी केले स्पष्ट : राजकारणात नवा नसल्याचे काढले उद्गार, चाहत्यांची घेतली भेट

वृत्तसंस्था/ चेन्नई

दक्षिण भारतातील सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याबद्दलचा अंतिम निर्णय 31 डिसेंबर रोजी घेणार असल्याची घोषणा केली. ‘रजनी सर’ या नावाने प्रख्यात असणाऱया या अभिनेत्याने मंगळवारी आपल्या चाहत्यांच्या भेटी घेतल्या. राजकारणासाठी मी नवा नाही, परंतु मी विलंब केला, हे देखील खरं आहे. तरीही याविषयी अंतिम निर्णय 31 डिसेंबर रोजी जाहीर करेन असे वक्तव्य रजनीकांत यांनी चाहत्यांना उद्देशून केले.

मागील अनेक महिन्यांपासून दक्षिणेच्या राजकारणात रजनीकांत यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू आहे. परंतु रजनीकांत यांनी स्वतः याबद्दल स्पष्ट भूमिका घेणे टाळले होते.

6 दिवस चाहत्यांना भेटणार

रजनीकांत सलग 6 दिवस स्वतःच्या चाहत्यांना भेटणार आहेत. मंगळवारी चाहत्यांना भेटण्याअगोदर रजनीकांत यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि फोटोसेशनमध्ये देखील भाग घेतला. यावेळी चाहत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील केली. सध्यातरी मी राजकारणात प्रवेश करणार असे सांगणार नाही, परंतु याविषयीचा अखेरचा निर्णय 31 डिसेंबर रोजी जाहीर करेन असे ते म्हणाले.

राजकारण प्रवेशाबद्दल संभ्रम

 राजकारणात प्रवेशाविषयी विचार करतो, तेव्हा मनात संभ्रम निर्माण होतो, कारण याबद्दल मी खूप काही जाणतो. स्वतःच्या चाहत्यांना भेटण्याचा क्षण अत्यंत आनंदाचा असतो, कधी आणि केव्हा भेटणार याविषयीचा निर्णय अगोदरच घेतला होता असे रजनीकांत यांनी सांगितले. रजनीकांत यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘अंधा कानून’ आणि ‘हम’ या चित्रपटात ते दिसून आले होते.

तयारी करावी लागते !

युद्धाच्या मैदानात उतरण्याच्या अगोदर तयारी तर करावीच लागते, जर उतरणारच असू तर विजयाची अपेक्षा घेऊनच उतरतो, विजयाची अपेक्षा न बाळगता मैदानात उतरण्यास कोणताही अर्थ नसतो. परंतु आम्हाला युद्धासाठी तयार रहावे लागेल. युद्धाचा अर्थ निवडणूक जिंकणे आहे, परंतु सध्या ते शक्य आहे का प्रश्न निर्माण होतो असे रजनीकांत यांनी राजकारणप्रवेशाच्या चर्चेबद्दल बोलताना सांगितले. यावेळी रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांचे स्मरण केले. जयललिता भेटण्यासाठी जेव्हा माझ्या घरी आल्या होत्या, तेव्हा मला अत्यंत आनंद झाला होता असे ते म्हणाले.

Related posts: