|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चित्रकार ओंकार बाणावले यांच्या व्यक्ती चित्रांचे प्रदर्शन

चित्रकार ओंकार बाणावले यांच्या व्यक्ती चित्रांचे प्रदर्शन 

प्रतिनिधी/ पणजी

 व्यंगचित्रे काढणे खूप कठीण असून त्यासाठी चित्रकारांची स्वातःची भाषा असते. एखाद्या व्यक्तीचा हाव भाव ओळखून कागदावर उतरणे त्यासाठी खूप तपच्छर्या करावी लागते. माझ्या विद्यार्थ्याने ती कला आत्मसात केली याचा अभिमान वाटतो, असे यावेळी पणजीतील कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांनी सांगितले. चित्रकार ओंकार सगुन बाणावले यांच्या व्यक्ती चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

 ओंकार बनावले यांचे व्यक्ती चित्रांचे प्रदर्शन कलाअकादमीच्या गॅलरीमध्ये मांडण्यात आले आहे. कोळशापासून व पाण्याच्या रंगापासून ही आकर्षक व्यक्ती चित्रे रंगवलेली आहे. हे प्रदर्शन 30 डिसेंबर पर्यंत खुले असणार आहे.

 आजच्या घडीला अशी वक्तीचित्रे काढणारे चित्रकार खूप कमी मिळतात. त्यासाठी सहनशिलता खूप गरजेची असते. वक्ती चित्रे काढणे ही खूप कठीण कला आहे. त्यासाठी मेहनत खूप गरजेची आहे. पण ओंकार यांनी यात आपले नाव कमविले आहे. गोवा कला महाविद्यायालयात शिक्षण घेऊन उच्च शिक्षण त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे घेतले आहे. त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. लहान वयातच त्यांनी एवढे मोठे नाव कमविले आहे ही आमच्यासाठी अभिमानची गोष्ट आहे, असे यावेळी इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर यांनी सांगितले.

 व्यक्ती चित्रे हे चित्र नसून ती एक खरोखरच व्यक्ती प्रमाणे असते त्यांच्या चेहऱयावर हाव भाव दाखविण्यात येताते. एक लहान चुक झाली तर ते चित्र वाया जाते. ओंकार यांनी कष्टाळू  लोकांची व्यक्ती चित्रे काढून त्यांनी एक चांगले कार्य केले आहे. हे चित्रप्रदर्शन खरोखरच पाहण्यासारखे आहे, असे यावेळी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईचे सुनील नांदोस्कर यांनी सांगितले.

Related posts: