|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » देवगडात सातपैकी चार ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा

देवगडात सातपैकी चार ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा 

रिफायनरीमुळे रामेश्वरमध्ये भाजपला फटका

स्वाभिमान, भाजप, गाव पॅनेलला प्रत्येकी एक ग्रामपंचायत

प्रतिनिधी / देवगड:

देवगड तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सातपैकी चार ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकवला. भाजप व स्वाभिमान पक्षाला प्रत्येकी एक तर फणसगाव ग्रामपंचायतीवर गाव पॅनेलने विजय मिळविला. ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या रामेश्वर ग्रामपंचायतीवर स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनेलने यश मिळविले. पावणाई व वानिवडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने गाव पॅनेलच्या माध्यमातून सत्ता मिळविली. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या वळिवंडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेने एकहाती सत्ता आणून आरोग्यमंत्र्यांची शान राखली.

शिवसेनेकडे वळिवंडे, वानिवडे, पावणाई, विठ्ठलादेवी अशा चार, तर स्वाभिमानकडे रामेश्वर तर शिरवली ग्रा. पं. वर भाजपने वर्चस्व मिळविले. पावणाई ग्रा. पं. वर शिवसेनेचे पप्पू लाड सरपंचपदी विराजमान झाले असले तरी त्यांनी गाव विकास पॅनेलमधून निवडणूक लढविली असल्याचे त्यांनी सांगितले. तर फणसगाव ग्रा. पं. मधून स्वाभिमान पक्षाच्या माजी पं. स. सदस्य सुभाष नारकर यांच्या पत्नी सायली नारकर या विजयी झाल्या असल्या तरी त्यांनी गाव पॅनेल असल्याचे सांगितले.

तालुक्यातील सात ग्रा. पं. च्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी येथील तहसील कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीत झाली. विठ्ठलादेवी ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात इतर पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढविली होती. या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली. सरपंचासह दोन उमेदवार विजयी झाले. फणसगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत समर्थ विकास पॅनेलच्याविरोधात अन्य पक्षांनी युती केली होती. या निवडणुकीतही समर्थ विकास पॅनेलने सरपंचपदासह निवडणुकीत विजय मिळविला.

सात ग्रा. पं. निवडणुकीचा निकाल पुढीलप्रमाणे – शिरवली/ सरपंच- सौ. भक्ती किशोर जठार, पाच सदस्य रिक्त. वळिवंडे/ सरपंच- अर्चना अरविंद घाडी (शिवसेना), विजयी सदस्य/ प्रभाग क्र. 1- मिलिंद जगन्नाथ मोंडकर (72 मते), तेजस्वीनी अरविंद सावंत (63 मते), प्रभाग क्र. 2- समिता मोहन तेली (96 मते), प्रभाग क्र. 3- राजेश लवू घाडी (126 मते), गजेंद्र एकनाथ सावंत (123 मते), प्रकाश विष्णू सावंत (78 मते), कल्पना कृष्णा सावंत (110 मते), वानिवडे/ सरपंच- सौ. प्राची प्रल्हाद घाडी (274 मते), विजयी सदस्य/ प्रभाग क्र. 1- वैष्णवी विनायक बांदकर (58 मते), माधवी गुरुनाथ वाडेकर (64 मते), फणसगाव/ सरपंच- सायली सुभाष कोकाटे (552 मते), विजयी सदस्य/ प्रभाग क्र. 1- सिद्धी गणेश पाटील (145 मते), कृष्णकांत हरिश्चंद्र आडिवरेकर (141 मते), प्रभाग क्र. 2- वंदना दयानंद नरसाळे (136 मते), सुजाता सुधीर पेंडुरकर (165 मते), प्रभाग क्र. 3- राजेंद्र दिलीप धुरी (178 मते), उदय धोंडू पाटील (206 मते), सरिता रमाकांत आंग्रे (204 मते), रामेश्वर/ सरपंच- विनोद विजयानंद सुके (337 मते, विजयी), दीपक आदम (45 मते), संतोष प्रकाश ठुकरुल (324 मते), प्रकाश धोंडू पुजारी (308 मते), नासीर मुसा मुकादम (144 मते), विजयी सदस्य/ प्रभाग क्र. 1- तन्वी धोंडू नरसाळे (203 मते), सुविधा सुनील पुजारे (208 मते), अजित खेमाजी पुजारे (226 मते), प्रभाग क्र. 2 – रमेश नामदेव अणसुरकर (140 मते), भक्ती भरत घारकर (144 मते), दीपक तुकाराम पुजारे (145 मते), प्रभाग क्र. 3- विल्यम कोजमा फर्नांडिस (137 मते), उजमा सईद मुकादम (162 मते). पावणाई/ सरपंच- गोविंद जयवंत लाड (336 मते), विजयी सदस्य/ प्रभाग क्र. 1- सुधीर अनंत धुरी (59 मते).

विठ्ठलादेवाr/ सरपंच- दिनेश शांताराम नारकर (241 मते), विजयी सदस्य/ प्रभाग क्र. 1- जयश्री जयंत नारकर (26 मते), प्रभाग क्र. 2- प्रिया प्रमोद बारवकर (127 मते), एकनाथ केशव कार्लेकर (110 मते), प्रभाग क्र. 3- विजयकुमार शाहू नारकर (134 मते), प्रदीप विठ्ठल नारकर (120 मते), साक्षी संदीप नारकर (116 मते).

या निवडणुकीत रामेश्वर ग्रा. पं. सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी उपसभापती नासीर मुकादम, फणसगाव ग्रा. पं. च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत सभापती जयश्री आडिवरेकर यांचे पती जयवंत धोंडू आडिवरेकर, वळिवंडे ग्रा. पं. च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत दोन प्रभागातून उमेदवारी दाखल केलेल्या माजी सभापती सदानंद उर्फ नंदू देसाई यांच्या पत्नी सौ. सायली सदानंद देसाई यांना पराभवाला सामोरे जावे लागले. फणसगाव ग्रा. पं. च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत माजी पं. स. सदस्य सुभाष कोकाटे यांच्या पत्नी सौ. सायली सुभाष कोकाटे, पावणाई ग्रा. पं. च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे गोविंद उर्फ पप्पू लाड यांनी विजय मिळविला.

एका मताने विजयी

विठ्ठलादेवी ग्रा. पं. च्या सदस्यपदाच्या निवडणुकीत प्रभाग क्र. एकमध्ये स्वप्ना नारकर व जयश्री नारकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. स्वप्ना नारकर यांना 25 तर जयश्री नारकर यांना 26 मते मिळाली. अवघ्या एका मताने जयश्री नारकर या विजयी झाल्या.

ग्रीन रिफायनरीचा फटका भाजपला

रामेश्वर ग्रा. पं. मध्ये ग्रीन रिफायनरीबाबत भाजपविरोधात वातावरण असल्याने याचा फटका या निवडणुकीत भाजपला बसला आहे. या निवडणुकीत शिवसेनेचे संतोष ठुकरुल, स्वाभिमानचे विनोद सुके व भाजपचे प्रकाश पुजारी यांच्यात तिरंगी व चुरशीची लढत झाली. या लढतीत स्वाभिमानचे विनोद सुके विजयी झाले. दोन दिवसांपूर्वी आमदार नीतेश राणे यांनी रामेश्वर येथील प्रचारसभेत रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी स्वाभिमानच्या पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन केले. त्याचा फायदा स्वाभिमानला या निवडणुकीत झाल्याचे दिसून आले.