|Saturday, February 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सासरच्या जाचाला कंटाळून मुलीची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून मुलीची आत्महत्या 

प्रतिनिधी / आजरा

सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळूनच आपली मुलगी सौ. सरीता उर्फ सानिका सागर साळुंखे हिने आत्महत्या केल्याची फिर्याद तीची आई सौ. पार्वती शंकर नांदवडेकर यांनी आजरा पोलीसात दिली आहे. या फिर्यादीवरून सौ. सरीता उर्फ सानिकाचा पती सागर, सासरा भैरू साळुंखे व सासू सौ. रत्नाबाई साळुंखे यांच्या विरोधात आजरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, हालेवाडी येथील सौ. सरीता उर्फ सानिका हिने आजरा येथील चाफेगल्लीत माहेरी गळफास घेऊन दि. 20 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. नवरा, सासरा व सासूकडून होणाऱया त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद आई सौ. पार्वती यांनी केली आहे. सासरच्या मंडळींनी आपल्या मुलीला जेवण करता येत नाही, घरातील कामे करता येत नाहीत, माहेरहून काही आणले या कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण केली. तीला मानसिक व शारीरीक त्रास दिला गेला. या त्रासला कंटाळूनच मुलीने माहेरी गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी नवरा, सासरा व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार नजीर पटेल करीत आहेत.

Related posts: