|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आजरा कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतराव देसाई यांना अभिवादन

आजरा कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतराव देसाई यांना अभिवादन 

प्रतिनिधी/आजरा

आजरा साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. वसंतराव देसाई यांच्या 12 व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर त्यांना अभिवादन करण्यात आले. चेअरमन अशोक चराटी, व्हा. चेअरमन आनंदराव कुलकर्णी यांच्या हस्ते स्व. देसाई यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी चेअरमन चराटी म्हणाले, स्व. देसाई यांनी कारखान्याची उभारणी करून तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे काम केले. आजरा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून स्व. देसाई यांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे चराटी यांनी सांगितले. तर कारखान्यासाठी मुबलक ऊस उपलब्ध व्हावा यासाठी तालुक्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करून कारखाना सक्षम करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ संचालक विष्णूपंत केसरकर, मुकुंदराव देसाई, दिगंबर देसाई, आनंदा कांबळे, संचालिका सौ. सुनिता रेडेकर, कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. दिवसभरात कारखान्याचे संचालक तसेच तालुक्यातील मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावर येऊन स्व. देसाई यांना अभिवादन केले.